मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील चढत्या क्रमावर आहे. दिल्लीत ७७ टक्क्यांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशातील एकूण बाधित रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी ८ लाखांचा आकडा पार केला. तर आजवर सुमारे २२,००० करोनाबाधित रुग्णांचे देशभरात मृत्यू झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, बांग्ला अभिनेत्री अभिनेत्री कोयल मल्लिकला (Koel Mallick) देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तिच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तिचे वडील आणि अभिनेता रंजीत मल्लिक या धोकादायक विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. 



खुद्द अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. 'माझे आई-वडील आणि पती निशपाल सिंह उर्फ राणे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आम्ही स्वतःला क्वरंटाइन करून घेतलं आहे.' असं तिने ट्विट करत सांगितलं आहे.



कोयलने ५ मे रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही गोड बातमी सर्वांना कळताच कलाविश्वातील अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु आता कोयल आणि तिचं कुटुंब लवकरात लवकर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येण्याची प्रार्थना तिचे चाहते आणि मित्रपरिवार करत आहेत.