कपूरांच्या घरीही लागतं भांड्याला भांड? `आलियाची घरात रोजची भांडणं...` सासू नीतू कपूरने केला खुलासा
Neetu Kapoor On Aaliya Bhatt: करण जोहरच्या शोमध्ये नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी सहभाग घेतला होता. या शोमध्ये दोघेही करण जोहरसोबत मस्ती करताना दिसल्या.
Koffee With Karan 8: कोणत्याही परिवाराचं उदाहरण घेतलं तर कधीना कधी भांड्याला भांड हे लागतंच असं म्हणतात. सासु-सूनेच्या नातं तर कधी आंबट तर कधी गोड असं असतं. सर्वसामांन्याच्या घरातच हे घडतं अस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक आहात. बॉलीवूडमधील मोठा कपूर परिवारदेखील याला अपवाद ठरला नाही. रणबीर कपूरशी लग्न करुन आलिया भट्ट कपूर फॅमिली आणि नीतू कपूर यांची सून झाली आहे. दरम्यान नीतू कपूर यांनी आलीयांच्या भांडणाचा किस्सा सांगितला आहे. बरं हे भांडण कोणत्या प्रॉपर्टीवरुन नाही. तर मग नेमकं कशावरुन आहे? हे समजल्यावर तुम्हालाही हसू येईल.
करण जोहरचा कॉफी विथ करण शो नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आला आहे. येथे आलेले पाहुणे स्वत:बद्द किंवा इतरांबद्दल काहीतरी बोल्ड स्टेटमेंट करतात. यामुळे या शोची पुढचे काही दिवस चर्चा होत राहते. काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणचे वादग्रस्त विधान याच शोमधून समोर आले होते. यावेळस करण जोहरच्या शोमध्ये नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी सहभाग घेतला होता. या शोमध्ये दोघेही करण जोहरसोबत मस्ती करताना दिसल्या.
दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत करण जोहरच्या शोमध्ये अनेक खुलासे केले आहेत. या शोमध्ये नीतू कपूरने आपल्या घरातल्या काही गोष्टी बाहेर आणल्या आहेत. तिने आपली नात राहा कपूरचे किस्से सांगितले आहेत. राहा आणि आलियामध्ये भांडण सुरू असल्याची घरची चार भिंतीतील गोष्ट तिने करणच्या शोमध्ये सांगितली आणि सासूने सुनेची तक्रार केल्याची चर्चा सुरु झाली.
रणवीर आणि आलियाची मुलगी राह एक वर्षाची झाली आहे. काही दिवसांपुर्वीच कपूर दाम्पत्याने राहाचा लूक मीडियाला दाखवला. दरम्यान करण जोहरने राहाला शुभेच्छा दिल्या आणि नीतू कपूरला तिच्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना आलिया भट्ट आणि सोनी राजदान राहावरुन भांडतात, असा खुलासा नीतू कपूरने केला.
राहचे नाव बोलण्यावरून भांडण
घरी मुलगी राहा लहानाची मोठी होत आहे. हाऊस हेल्पला मी नेहमी सांगत असते की राहला पप्पा बोलायला सांग पण सोनी राहला मम्मी बोलायला सांगते. नीतूने हा किस्सा सांगितल्यावर करण हसायला लागला. या प्रकरणावरून घरात भांडणे होतात? असे पुढे म्हणाला.
मम्मा की मम्मम?
नीतू कपूरने एक किस्सा करणला सांगितला. मी एक दिवशी घरी गेल्यावर आलिया माझ्याकडे येऊन म्हणाली की राहने मम्मा म्हटले. तर मी तिला म्हटले तिने मम्म म्म म्हटले आहे. त्यामुळे जास्त आनंदी होऊ नकोस. राहा ना-ना नाही तर दा-दा बोलते, असेही नीतू कपूरने सांगितले.
राह नाव परफेक्ट
राह हे नाव नातीसाठी खूप परफेक्ट असल्याचे नीतू कपूरने करणच्या शोमध्ये सांगितले. कारण जेव्हाही तिच्याकडे पाहते तेव्हा ती मला शांत वाटते. तेव्हा हे नाव तिच्याशी पूर्णपणे जुळते असल्याचे मला वाटते.तिचा इतका सुंदर, गोड, आनंदी चेहरा आहे. मी तिला पाहते तेव्हा मला खूप हायसे वाटते, असे नितू कपूर यांनी यावेळी सांगितले.
नोव्हेंबर 2023 मध्ये राह एक वर्षाची झाली. राह एक वर्षाची झाल्यावर आलियाने तिचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. यावेळी रणवीर कपूर आणि आलियाने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. राह दिसायला खूपच सुंदर आहे.