गरोदरपणातच लिव्ह इन पार्टनरसोबत विवाहबंधनात अडकली ही अभिनेत्री
कोण आहे ही अभिनेत्री
मुंबई : बंगाली सिनेमांमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेत्री अपर्णा सेन यांची मुलगी कोंकणा सेन बॉलिवूडमध्ये हटके सिनेमे करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सिनेमांमधील उत्कृष्ठ अभिनयाकरता तिला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला आहे. आज कोंकणा सेन शर्माचा वाढदिवस.
तिच्या वाढदिवसादिवशी जाणून घेऊया तिच्या जीवनातील कटू सत्य... कोंकणा लोकप्रिय पत्रकार आणि सायन्स रायटर मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. तिने कोलकाताच्या इंटरनॅशनल स्कूल आणि सेंट स्टीफेन कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे.
1983मध्ये 'इंदिरा' या बंगाली सिनेमाच्या मार्फत तिने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून कामाला सुरूवात केली. कोंकणाने आई अपर्णाने दिग्दर्शित केलेल्या इंग्लिश भाषा 'Mr and Mrs Iyer' या सिनेमात देखील काम केलं आहे. याकरता तिला बेस्ट अॅक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्ड मिळाला.
एवढंच नाही तर 2005 मध्ये कोंकणाने मधुर भंडारकरच्या 'पेज 3' सिनेमात पत्रकाराची भूमिका साकारली होती. या सिनेमाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कोंकणाच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं तर सप्टेंबर 2010 मध्ये तिने बॉयफ्रेंड रणवीर शोरेसोबत अगदी खाजगी पद्धतीने लग्न केलं.
कोंकणा सेन लग्नाअगोदरच आई झाली होती. त्यामुळेच तिने अतिशय गुपचुप लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसांनीच हे दोघं आई-बाबा झाल्याची बातमी समोर आली. 15 मार्च 2011 मध्ये कोंकणाने मुलाला जन्म दिला. आणि तिचं लग्न सप्टेंबर 2010 मध्ये झालं.
मार्च 2011 मध्ये कोंकणाच्या मुलाच्या जन्मानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की ती लग्नाअगोदरच गरोदर होती. त्यानंतर कोंकणा आणि रणवीरमध्ये वाद होत असल्याची माहिती देखील समोर आली. लग्नाच्या 5 वर्षांनंतर दोघांनी 2015 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला.