मुंबई : अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये चांगला जम बसवलेली. तसेच, सध्या बॉलिवूडमध्ये हवी तितकी सक्रीय नसतानाही आपल्याभोवतीची वलय कायम ठेवत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन-शर्मा. आज (रविवार, 3 डिसेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या वाढदिनी कोंकणाबद्धलच्या काही हटके घटना...


1983मध्ये बाल कलाकार म्हणून अभिनयाला सुरूवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंकणा सेन शर्मा ही बॉलीवुडची महत्त्वाची आणि लोकप्रिय अभिनेत्री असून, ती बंगाली चित्रपट दिग्दर्शक अपर्णा सेन आणि प्रसिद्ध पत्रकार विज्ञान साहित्य लेखक मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. तिने कोलकाता इंटरनॅशनल स्कूल आणि सेंट स्टीफन कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तिने 1983मध्ये बंगाली चित्रपट 'इंदिरा'मधून बालकलाकाराच्या रूपात अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले.


उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार


कोंकणाने आपल्या आईच्या दिग्दर्शनाखाली इंग्रजी चित्रपट 'Mr. and Mrs. Iyer'मध्ये अभिनय केला. उल्लेखनीय असे की, कोंकणाला या चित्रपटासाठी उत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. इतकेच नव्हे तर, तिला 2005 मध्ये आलेल्या मधूर भांडारकरच्या 'पेज 3' सिनेमातील अभिनयासाठीही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.


 कोंकणाचे खासगी आयुष्य...


 कोंकणा सेन शर्माच्या खासगी आयुष्यबद्धल बोलायचे तर,  चित्रपट 'आजा चल ले' चित्रपटादरम्यान तिची ओळख अभिनेता रणवीर शौरीसोबत झाली. दरम्यानच्या काळात दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या. याच काळात कोंकणा प्रेंग्नंट राहिली होती. त्यामुळे 2010मध्ये दोघांनी मिळून गुपचूप लग्न उरकले. काही काळातच कोंकणाने एका गोड बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव हारून असे ठेवण्यात आले. वाईट असे की, हे लग्न फार काळ टीकले नाही. 2015मध्ये एकमेकांच्या सहमतीने कोंकणा आणि रणवीरने घटस्फोट घेतला. 


पुरस्कार


 अभिनयासाठी कोंकणाला उत्कृष्ट अभिनेत्रिचा पुरस्कारही मिळाला आहे. 2002 मध्ये चित्रपट मिस्टर अँड मिसेस अय्यर चित्रपटासाठी तिला सहअभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर, पेज थ्री चित्रपटासह इतर भूमिकांसाठी तिला 5 फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.