Kriti Sanon Instagram Post: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याला मंदिर परिसरात किस केल्याने क्रिती सेनन वादात अडकली आहे. मंदिराच्या बाहेर निरोप घेताना ओम राऊत याने क्रिती सेननच्या गालावर किस केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. ओम राऊत आणि क्रिती सेनन यांनी मंदिर परिसरात हे कृत्य केल्याने अनेकांनी नाराजी जाहीर केली. काही चाहत्यांनीही त्यांना आपण कुठे आहोत याचं भान बाळगायला हवं असा सल्ला दिला आहे. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 जून रोजी ओम राऊत आणि क्रिती सेनन तिरुपतीमधील वेंकटेश्वरा मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी मंदिराच्या बाहेर निरोप घेताना दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने क्रिती सेननला गालावर किस केलं. काही वेळातच दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर त्यावर व्यक्त होताना अनेकांनी हे फार चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. यावर त्यांची बाजू घेणारेही आहेत. दरम्यान टीका करणाऱ्यांमध्ये भाजपा नेते आणि तेलंगणाच्या चिलकूर बालाजी मंदिराचे (Chilkur Balaji Temple) मुख्य पुजारीही आहेत. 


क्रिती सेननची पोस्ट


किसवरुन वाद सुरु असताना क्रिती सेननने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर केली आहे. तिरुपती मंदिर भेटीदरम्यान मिळालेलं प्रेम आणि आपुलकीबद्दल तिने आभार मानले आहेत. चाहत्यांचे आभार मानताना क्रितीने आपलं मन सकारात्मकतेने भरलं असल्याचं म्हटलं आहे. 


"हॉटेल रुममध्ये जा आणि...", क्रिती सेननने मंदिरात Adipurush च्या दिग्दर्शकाला किस केल्याने पुजारी भडकले


 


"आभार, माझं मन सकारात्मकतेने भरलं आहे. तिरुपतीमधील पवित्र आणि शक्तिशाली ऊर्जा; काल रिलीजआधी झालेल्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांना आदिपुरुष आणि जानकीला दिलेलं प्रेम...माझ्या चेहऱ्यावर अद्यापही हास्य आहे," असं क्रिती सेननने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 



बालाजी मंदिराच्या पुजारींची टीका 


तेलंगणाच्या चिलकूर बालाजी मंदिराच्या (Chilkur Balaji Temple) मुख्य पुजारींनी ओम राऊत आणि क्रिती सेननच्या किसवरुन टीका केली आहे. "ही एक निषेधार्ह कृती आहे. पती आणि पत्नीही मंदिरात एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेल रुममध्ये जाऊन हे करु शकता. तुमचं वागणं हे रामायण आणि देवी सीतेचं अपमान करणारं आहे," असं ते म्हणाले आहेत.



16 जूनला चित्रपट होणार प्रदर्शित


'आदिपुरुष' चित्रपट रामायणावर आधारित ओम राऊतने याचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. प्रभास प्रभू श्रीराम आणि क्रिती सीतामातेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान रावणाची भूमिका निभावत आहे. प्रभासच्या करिअरमधील हा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. 16 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.