Kriti Sanon : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन ही नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाच्या प्रमोशनवरुन कोणत्या गोष्टी घडतात आणि तिला काय वाटतं याविषयी सांगितलं आहे. त्याविषयी सांगताना चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, एका शहरातून दुसऱ्या शहरात जात होती. त्यामुळे ती खूप दमली होती आणि इतके दमले होते की एक दिवस तिनं चित्रपट प्रमोट करण्यास नकार दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रितीनं एका पॉडकास्टला भेट दिली होती. त्यावेळी तिनं या चकाकणाऱ्या विश्वातील आयुष्याविषयी अशा गोष्टींचा धक्कादायक खुलासा केला की ती तिच्या चित्रपटाला प्रमोट करत होती, ज्यासाठी ती एकमागे एक वेगवेगळ्या शहरांमध्ये, रिअॅलिटी शो आणि कॉलेजमध्ये जात होती. त्यासाठी त्यांनी एक चार्टर प्लेन देखील बूक केली होती. ज्यातून ते एका शहरातून दुसऱ्या शहरात लागोपाठ जाऊन प्रमोट करतील. ते रात्री झोपायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एका दुसऱ्या शहरात जायचं. 



पुढे याविषयी सांगत क्रिती म्हणाली, 'प्रत्येकवेळी मुलाखतीत तिला तेच प्रश्न विचारण्यात यायचे आणि ती तेच उत्तर द्यायची. तिनं सांगितलं की अशा वेळी असं वाटतं की बरं झालं असतं जर मी एक टेप रेकॉर्डर माझ्यासोबत घेऊन फिरू शकले असते आणि बोलू शकली असती की पहिल्या प्रश्नासाठी एक दाबा, दुसऱ्या प्रश्नासाठी दोन दाबा. या सगळ्या धावपळीच्या रूटिनमध्ये अखेरच्या दिवसात एक रिअॅलिटी शोमध्ये मला जायच होतं. माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मी तयार होत होते. त्यावेळी मी किती दमले याची मला जाणीव झाली आणि मी रडू लागले. मी रडत म्हणू लागले की मी खूप दमले आणि आता मला हे नाही करायचंय, माझ्यात आता इतकी ताकद उरलीच नाही.'


क्रितीनं पुढे सांगितलं की काही गोष्टी आहेत जे करणं तिला आवडत नाही, पण मजबूरीमुळे कराव्या लागतात. त्यात फोटोशूट करणं पहिलं काम आहे, जे डिझायनरमुळे करावं लागतं. जर तिनं असं केलं नाही तर तिला तो ड्रेस खरेदी करावा लागतो. एकदा क्रितीनं दमल्यानंतर नकार दिला होता. इतकंच नाही तर तो ड्रेस खरेदी करण्यासाठी खूप मोठी किंमत देखील मोजली. 


हेही वाचा : सोनाक्षी-झहीरच्या रुमसमोर आला सिंह! डरकाळी ऐकून सगळेच घाबरले


क्रितीनं यावेळी एका पुरस्कार सोहळ्याचा देखील उल्लेख केला. जेव्हा अभिनेत्री स्वत: तयार होऊन जायच्या. स्वत: चे कपडे, त्यांच्या स्टाईलमध्ये एगदी सिंपल लूक करुन. अनेकदा त्यांनी डेनिम परिधान करून पुरस्कार स्विकारले आहेत. माझी मनापासून इच्छा आहे की या गोष्टी बदलायला हव्या. आम्ही अनेकदा अभिनयापेक्षा जास्त या सगळ्या गोष्टी करण्यात व्यग्र असतो.'