Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Video With Lion : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत असते. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर हे सतत कुठे ना कुठे फिरायला जाताना दिसतात. दोघं कधी कुठे तर कधी कुठे फिरायला जातात. यावेळी दोघं नवीन वर्षांच्या आधी सुट्टीचा आनंद घेत आहेत. सोनाक्षीनं त्यांच्या या ट्रिपटे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता त्यांच्या एका व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ज्यात ते दोघे कोणत्या अलार्मच्या आवाजानं उठले ते दाखवलं आहे.
हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाक्षी आणि झहीरच्या रुमपर्यंत सिंह आल्याचे दिसते. तर त्यावेळी सोनाक्षी ही बेडवर असते आणि अचानक समोर सिंह असल्याचं तिला दिसतं. तर तिला पाहून लांब उभा असलेला सिंह हा डरकाळी फोडताना दिसतोय. हे पाहून सोनाक्षी खूप घाबरली तरी सुद्धा ती व्हिडीओ शूट करत राहिली. झहीरनं त्याच्या फोनमध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. तर सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की 'या दोघांसोबत.' हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. तर त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, या व्हिडीओत मागे सिंहाला पाहून आइचनरमधलं लोकप्रिय गाणं द लायन स्लीप्स टुनाइट हे गाणं लावायला हवं. जे 2019 च्या डिज्नी फिल्म 'द लायन किंग' मधील आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सोनाक्षी आणि झहीर हे गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. हे कपल तिथे खूप आनंद घेत आहे तर सोनाक्षी अनेकदा तिच्या नवऱ्यासोबत अॅडव्हेंचर करताना दिसते. सोनाक्षी सिन्हानं 23 जून 2024 रोजी झहीर इक्बालशी सिविल मॅरेज केलं. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा ही लवकरच निकिता रॉय अॅन्ड द बूक ऑफ डार्कनेसमध्ये दिसली. त्याशिवाय ती यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बडे मिया छोटे मिया' चित्रपटातील 'काकूडा' गाण्यात दिसली.