Kriti Sanon : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननचे लाखो चाहते आहेत. तिच्या बोल्ड स्टाईलसाठी क्रिती सेनन ओळखली जाते. क्रिती सध्या एकामागे एक चित्रपट करत असल्याचे दिसत आहे. आता पर्यंत तिनं अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडनंतर क्रितीनं कॉस्मॅटिकच्या जगात पदार्पण केलं आहे. आता क्रिती फक्त एक अभिनेत्री नाही तर एक बिझनेस वूमन देखील आहे. आता क्रिती सेननं स्किन केयर ब्रॅंड लॉन्च केलं. त्यासाठी तिची बहीण नुपूरनं तिच्यासाठी एक स्पेशल मेसेज देखील दिला आहे. त्या पोस्टमधून नुपूरनं क्रितीची स्तुती केली आहे. पण काही नेटकऱ्यांनी त्या दोघींना ट्रोल केलं आहे. एक नेटकरी तर त्या दोघींना थेट फ्लॉप सिस्टर्स असं म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 जुलै रोजी क्रिती सेननचा वाढदिवस होता. त्या दिवशी नुपूरनं क्रितीसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये नुपूरनं क्रितीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत क्रिती तिच्या नव्या कॉस्मॅटिक ब्रॅंडची घोषणा करताना दिसली. याच व्हिडीओला शेअर करत नुपूरनं क्रितीला वाढदिवसासोबतच तिच्या या नव्या ब्रॅंडसाठी एक सुंदर असं कॅप्शन लिहित क्रितीला वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छांसोबत तिला भविष्यासाठी ऑल द बेस्ट म्हटलं आहे. आपल्या बहिणीनं केलेल्या या कामाची स्तुती करत नुपूर थांबू शकत नव्हती. हे पाहता काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. तर अनेकांनी क्रिती सेननला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्या दोघी बहिणींना ट्रोल केलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


क्रिती आणि नुपूर या दोघींना ट्रोल करत असलेल्या एका नेटकऱ्याची कमेंट पाहता नुपूरनं त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. खरंतर तो नेटकरी कमेंट करत त्यांना 'फ्लॉप सिस्टर्स' असं म्हणाला. ही कमेंट पाहता नुपूर त्या नेटकऱ्याला सडे तोड उत्तर देत म्हणाली, 'तरी तू आम्हाला फॉलो करतोस.' तर नुपूरच्या या पोस्टवर कमेंट करत चित्रपटसृष्टीतील अनेकांनी क्रितीला शुभेच्छा दिल्या आहेत. 


हेही वाचा : Urfi Javed चा इको फ्रेंडली ड्रेस पाहिलात का? यावेळी नेटकरी देखील फिदा


क्रितीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच 'आदिपुरुष' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाई करु शकला नाही. त्या आधी तिचा 'भेडिया' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लवकरच क्रिती टायगर श्रॉफसोबत 'गणपत पार्ट 1' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून क्रिती आणि टायगर श्रॉफची पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. हा एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट असणार आहे. त्याचं नाव अजून ठरवण्यात आलं नाही. त्याशिवाय 'द क्रु'मध्ये देखील क्रिती दिसणार आहे.