मुंबई : अभिनेता वरूण धवन स्टारर 'स्टीट डान्सर ३डी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटानंतर तो 'मिस्टर लेले' चित्रपटामध्ये झळकणार आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. परंतु हे पोस्टर पाहून हा चित्रपट फ्लॉप होणार अशी भविष्यवाणी स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आणि अभिनेता केआरकेने केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरच्या माध्यमातून त्याने वरूणवर निशाणा साधला आहे. 'वरूण धवन हा एकमेव अभिनेता आहे. ज्याचे सलग ६ चित्रपट अपयशी ठरले आहेत. त्यामुळे वरूणला त्याच्या कामगिरीवर गर्व वाटायला हवा.' अशा आशयाचे ट्विट त्याने केलं.



सध्या केआरकेचं ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान वरुण धवनच्या चाहत्यांनी कमाल खानवर जोरदार टीका देखील केली आहे. 



'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटानंतर तो 'कुली नं.१' चित्रपटात देखील झळकणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये रिमेक साकारण्याचा काळ सुरू आहे. रीमेकच्या काळात जून्या चित्रपटांना पुन्हा दुजोरा देण्याचे काम सूरू आहे. आता आभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिष्मा कपूर स्टारर चित्रपट 'कुली नंबर १' चिपटात अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरूण धवण झळकणार आहेत. 


'कुली नंबर १' चित्रपटाच्या माध्यमातून हे दोन कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. तब्बल २४ वर्षांनंतर 'कुली नंबर १' मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.