मुंबई : सध्या अनेक कलाकार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर जात आहेत. तर काही कलाकार सुट्ट्यांचा आनंद घेऊन आपल्या मायदेशी परतले आहेत. आभिनेत्री कृति सेनन तिच्या हॉलिडे मूडमधून बाहेर आलेली नाही. सध्या ती गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कृतिने तिच्या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो इन्टरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी कृतिचा 'लुका छुपी' चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. चित्रपटात कृति अभिनेता कार्तिक आर्यनसह झळकली होती. 



अभिनेत्री कृति सेनन आणि अभिनेता दिलजीत दोसांझसह 'अर्जुन पटियाला' चित्रपटात एकत्र भूमिका साकारणार आहेत. १९ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपट ३ मे रोजी चित्रपटगृहात धडकणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. टी-सीरिज आणि मैडॉक फिल्म्स यांच्या बॅनरखाली चित्रपट साकारण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित जुगराज यांनी केले आहे.