`त्या टवाळखोरचच नाव मिळालं..`; तैमूरवरून कुमार विश्वास यांनी सैफ- करीनाला सुनावले खडे बोल
Kumar Vishwas on Taimur`s Name : लोकप्रिय कवी कुमार विश्वास यांनी सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलाच्या नावावरून केली टीका
Kumar Vishwas on Taimur's Name : लोकप्रिय कवी कुमार विश्वास पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावेळी त्यांनी सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलाच्या नावावर आक्षेप व्यक्त केला आहे. सैफ आणि करीनानं त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं त्यांना ट्रोल केलं आहे. यावेळी ऐतिहासिक व्यक्तींचा उल्लेख करत त्यांच्या नावाच्या आवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. हे पहिल्यांदा नाही की जेव्हा कुमार विश्वास यांनी सैफ आणि करीनाच्या मुलाचं तैमूर नाव ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांची नाव ठेवताना खूप विचार करायला हवा. त्यांनी सांगितलं की ते एका ऐतिहासिक आक्रमणकर्त्याचे नाव आपल्या मुलाला ठेवण्या ऐवजी दुसरं नावं निवडायला हवी होती.
कुमार विश्वास यांनी मुरादाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात याविषयी वक्तव्य केलं आहे. लोकप्रिय सेलिब्रिटींनी ते कसे विचार करतात त्याविषयी थोडा जास्त विचार करणं गरजेचं आहे. आता हे स्वीकारलं जाणार नाही की लोकप्रियता आमच्यामुळे मिळणे, पैसे आम्ही देणार, तिकिट आम्ही खरेदी करू, हीरो आणि हीरोइन आम्ही बनवून आणि तुमचं तिसरं लग्न झाल्यानंतर जे मुल होईल त्याला तुम्ही बाहेरून आलेल्या कोणत्या आक्रमणकारीचं नाव द्याल. हे चालणार नाही. इतकंच नाही तर इतकी नावं आहेत. काही ठेवलं असतं. रिजवान ठेवलं असतं, उस्मान ठेवलं असतं, यूनुस ठेवल असतं, पण त्याच्या नावावर कोण नाव ठेवणार. तुम्हाला एकच नाव मिळालं.
पुढे कुमार विश्वास म्हणाले, 'ज्या उद्धट व्यक्तीनं, ज्या लंगड्या व्यक्तीनं भारतात येऊन इथल्या आई-बहिणींचा बलात्कार केला, तो टवाळच भेटला तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव ठेवण्यासाठी आणि आता त्याला हीरो बनवाल. (वो लफंगा ही मिला तुम्हें इस प्यारे से बच्चे का नाम रखने के लिए,अब अगर इसे हीरो बनाओगे) तर त्याला खलनायकही बनवणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. हा जागृत भारत आहे, हा नवा भारत आहे.'
दरम्यान, तैमूरच्या नावावरून वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. त्याआधी झहीर इक्बालसोबत सोनाक्षी सिन्हाच्या लग्नावरून देखील कुमार विश्वास यांनी कमेंट केली होती. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले हते. विश्वास यांनी या आधी लग्नाला घेऊन कमेंट देखील केल्या होत्या. त्यावर मुकेश खन्ना यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती.