मुंबई : 'कुमकुम भाग्य' फेम पूजा बॅनर्जी लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. अभिनेत्री पुढील वर्षी मार्चमध्ये बाळाला जन्म देणार आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बोलत असताना पूजाने तिच्या प्रेग्नेसीमधील काही खास क्षण शेअर करत खुलासा केला की तिने आणि तिचा पती संदीप सेजवाल यांनी गेल्या वर्षी त्यांचे कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला. पूजाने सांगितले की, या दिवसात ती तिच्या प्रेग्नेसीचा खूप आनंद घेत आहे. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पूजा बॅनर्जी म्हणाली, “मी आणि संदीप 2020 मध्ये नियोजन करत होतो, पण 2019 मध्ये नच बलियेत झालेल्या एका अपघातानंतर आम्ही विचार थांबवला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे पूजा म्हणाली, शुटींगच्या सेटवर मला प्रेग्नेंसीबद्दल कळालं. काही दिवस पूजाची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे तिने तपासणी केली. तपासणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले आणि तिला प्रेग्नेसीबद्दल कळालं. 'त्या दिवशी मी संदीपला मला घेण्यासाठी बोलावलं. कारण मला ही बातमी त्याला फोनवर सांगायची नव्हती. जेव्हा मी त्याला ही आनंदाची बातमी सांगितली तेव्हा तो आनंदाने डान्स करू लागला...'



प्रेग्नेसी दरम्यान पूजा बॅनर्जी तिच्या कामातून ब्रेक घेण्याचा विचार करत नाहीये. अभिनेत्री म्हणाली की तिला ते जसे आहे तसे चालू द्यायचे आहे आणि काही महिन्यांत पूजा शो सोडण्याची योजना आखत असल्याचे नमूद केले.