Shraddha Arya and Karan Johar:  टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा आर्या हिने आपल्या करिअरची सुरूवात हिंदी, तामिळ, तेलूगु भाषिक चित्रपटांतून केली आहे. परंतु तिला सर्वात जास्त प्रसिद्धी ही टेलिव्हिजन सिरियल्समधूनच मिळाली आहे. 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' या सिरियल मधून तिने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 'ड्रीम गर्ल', 'तूम्हारी पाखी' अशा सिरियल्समधून काम केले. ज्या अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्या. नुकतीच सुरू असलेली 'कुंडली भाग्य' ही सिरियलही कमी कालावधीत प्रंचड लोकप्रिय ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता लवकरच श्रद्धा आर्या आपल्या ड्रीम प्रोजेक्टमधून काम करणार आहे. आणि हा प्रोजक्ट आहे 'धर्मा प्रोडक्शन'चा म्हणजेच करन जोहरचा. श्रद्धा आर्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवरून नुकतीच ही गूड न्यूज आपल्या चाहत्यांकडे शेअर केली आहे. ज्यात तिने करनने तिला स्वहस्ताक्षरात लिहिले पत्रही पोस्ट केले आहे. ज्यात करनने तिला अनेक शुभेच्छा देत धर्मा प्रोडक्शनमध्ये तूझे स्वागत आहे असा संदेश दिला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही भलताच आनंद झाला आहे. अद्याप या प्रोजेक्टचे नाव काय असेल, आणि श्रद्धाची यातली भुमिका काय असेल याबाबत तिने खुलासा केला नाही. 


करन जोहर हा दिग्दर्शक फक्त स्टार कीड्सना लॉन्च करतो असा शिक्का करनवर लावला जातो. दोन वर्षांपुर्वी याच नेपोटिझमच्या वादामुळे करनला चाहत्यांकडून सुनावले गेले. सध्या सुरू असलेल्या 'कॉफी विथ करन' या रिएलिटी शोमधूनही सध्या करनचे आवडते कलाकार हजेरी लावत आहेत. त्यात अगदी स्टार कीडचाही समावेश आहे. आलिया भट्ट, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सारा अली खान इत्यादी. करन जोहर आपल्या 'धर्मा प्रोडक्शन'मधून इतर कलाकारांनाही वाव देणार की नाही हाही एक प्रश्नच.


 


सध्या करन जोहर आपल्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाचे शुटिंग पुर्ण झाले आहे. याबद्दल आलियाने आपल्या इन्टाग्रामवरून या चित्रपटाचे शुटिंग संपन्न झाल्याचे तिच्या चाहत्यांना कळवले आहे.