Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :  गेल्या 16 वर्षांपासून हा शो यशस्वीपणे सुरू आहे. ज्यामध्ये अनेक कलाकारांनी हा शो सोडला आणि पुन्हा या शोमध्ये सामील झाले. 2008 पासून सुरु झालेला हा शो सध्या प्रेक्षकांचा सर्वात आवडता शो ठरला आहे. सध्या हा शो सब टीव्हीवर प्रसारित होत आहे. मात्र, आता शोमधील आणखी एका पात्राने 16 वर्षांनंतर शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोलीची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहने तब्बल 16 वर्षांनंतर तारक मेहता का उल्टा चष्मा शोला अलविदा केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुश शाह भावूक


16 वर्षांनंतर अभिनेता हा शो सोडत आहे. कुश शाहने शोबद्दल आभार देखील व्यक्त केले आहेत. त्याने म्हटले आहे की, ज्यावेळी हा शो सुरू झाला तेव्हा मी खूप लहान होतो. तुम्ही मला खूप प्रेम दिले आहे. या कुटुंबाने मला तुमच्यासारखे प्रेम दिले आहे. मी या शोमध्ये खूप आठवणी बनवल्या आहेत. या प्रवासासाठी मी श्री असित मोदी यांचे आभार मानतो ज्याने माझे रूपांतर गोलीमध्ये केले आहे.


कुश शाहने व्हिडिओमध्ये फोटोंसह आपल्या 16 वर्षांच्या प्रवासाची आठवण करुन दिली आहे. त्याचबरोबर त्याने म्हटलं आहे की, तुमची बुलेट तशीच राहील. तोच आनंद, तेच हास्य, तोच खोडसाळपणा, तारक मेहतामध्ये अभिनेता बदलू शकतो, पण पात्र नाही. असं त्याने म्हटलं आहे. 


शो सोडण्याचे कारण काय? 


कुश शाह आता पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाणार आहे. त्यामुळे 16 वर्षांनंतर कुश शाह यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा शोला अलविदा केलं आहे. 



शोमध्ये पुढे काय घडणार?


पुढील भागांमध्ये, कुश त्याच्या व्यक्तिरेखेचा निरोप घेताना दिसणार आहे. यावेळी शोमध्ये रविवारचा नाश्ता त्यांच्याकडून होस्ट करायचा असे हाथी कुटुंब ठरवते. तो प्रत्येकाला बनारसी नाश्ता देईल, ज्यामध्ये कचोरी, रबडी आणि जिलेबीचा समावेश असणार आहे. गोली या सर्व वस्तू घेण्यासाठी जातो. गोली आणि सखाराम भिडेची स्कूटर घेऊन नाश्ता करायला जातो. पण रेस्टॉरंटमध्ये तो पोहोचलेला नसतो. त्यानंतर गोली आणि सखारामचा शोध सुरु होतो.