मुंबई : अभिनेता कुशल पंजाबीने 26 डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 42 वर्षीय कुशल पंजाबीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तात्काळ त्याला भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यावेळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर अशी बातमी आली की, कुशलचं वैवाहिक जीवन चांगल नव्हतं. यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. पत्नी आणि तो वेगळं झाल्यामुळे त्याला मुलाला भेटता येत नव्हतं. याची सल त्याच्या मनता होती. कुशलच्या आत्महत्येला पूर्णपणे पत्नी ऑड्रीला जबाबदार धरण्यात आलं. आता कुशलच्या आत्महत्येनंतर आठ दिवसांनी पत्नीने आपली बाजू मांडली आहे. 


कुशल पंजाबीच्या पत्नीने म्हटलं की,'आमच्या नात्यात तो अयशस्वी ठरला. तसेच तो बेजबाबदार वडील देखील होता.' असे आरोप कुशलच्या पत्नीने त्याच्यावर केले आहेत. ऑड्री पुढे म्हणते की,'आमच्या नात्यात अनेक समस्या होत्या. पण आमचं लग्न अपयशी ठरलं असं नाही. मी कधीच आमचा मुलगा कियानला त्याच्यापासून रोखलं नाही. पण तोच किआनच्याबाबतीत जबाबदार नव्हता.'


एवढंच नव्हे तर पुढे ऑड्री सांगते की,'मी कुशलला अनेकदा शेंगाईमध्ये येऊन राहण्याचा सल्ला दिला. पण याकडे त्याला कलच नव्हता. महत्वाचं म्हणजे मीच त्याचा सर्व खर्च करत होते. किआनला देखील त्याच्या वडिलांकडून चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांच नातं फुलू शकलं नाही. मी आमचं नातं सांभाळण्याचे खूप प्रयत्न केले,' असं देखील ऑड्री म्हणाली. 


'माझा माझ्या कंपनीशी करार झाला होता. हे कुशलने कधीच समजून घेतलं नाही. त्याला लंडनमध्ये स्थायिक व्हायचं होतं. नोकरी सोडणं मला शक्य नव्हतं. मुलाच्या भविष्याचा कुशलने कधीच विचार केला नाही तो निष्काळजी बाप होता. मी आमचं नातं संपवलं त्याला नाही. त्याने आत्महत्या केली तेव्हा मी किआनसोबत फ्रान्समध्ये ख्रिसमस साजरा करत होती. मला कळत नाही, त्याच्या आत्महत्येला मला का जबाबदार धरलं जात आहे,' अशी भावना ऑड्रीने व्यक्त केली.