मुंबई : बॉलिवूडची आयटम गर्ल अभिनेत्री नोरा फतेहीच्या डान्सचं वेड कोणाला माहिती नसेल? पण नोरा फतेही प्रत्येक पाऊल परिपूर्ण करण्यासाठी किती मेहनत घेते हे फार कमी लोकांना माहिती आहे. 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटात तिचं ब्लॉकबस्टर गाणं कुसु-कुसू दिसणार आहे. ज्यासाठी शूटिंग करताना तिच्या पायाला दुखापत झाली. मात्र शूटिंगदरम्यान नोरा फतेहीच्या पायाला दुखापत झाली आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  ज्याव्हिडिओत  नोरा जखमी झालेली दिसत आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुसु कुसु गाणं रिलीज झाल्यानंतर नोराने सोशल मीडियावर या गाण्याचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नोरा गळ्याभोवती जखम झाल्याचं सांगते. गाण्यात नोराने हेवी बॉडीसूट परिधान केला आहे. ज्याचा दुपट्टा तिच्या नेकलेसला बांधला होता. गाणं शूट करतेवेळी नोराच्या नेकलेस वाईटरित्या फसतो. ज्यामुळे नोराला श्वास घ्यायला त्रास होतो.  नेकलेसमुळे नोराच्या गळ्याला जखम झाली आहे. 


नोराच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंतचा तिचा सगळ्यात खराब अनुभव होता. जो कदाचित ती कधीच विसरु शकत नाही. गाण्यात नोराने ड्रेसला मॅच करणारी हाई हिल्स घातली होती. शूटिंग दरम्यान तिच्या पायात काच घुसते. ज्यानंतर तिच्या पायातून रक्त येवू होतो. एवढा त्रास होवूनही नोराने पायाला पट्टी बांधली आणि शूटिंग पूर्ण केलं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नोरा फतेहीला वेदना असह्य
अभिनेत्री नोरा फतेही या दुखापतीमुळे एवढं दुखत होतं की, तिने सर्वांसमोर आक्रोश केला. क्रू मेंबर्सने दुखापतीवर औषध लावलं दुखापतीनंतर क्रू मेंबर्सनी लगेच तिच्या पायाला औषध लावलं. अभिनेत्री नोरा फतेहीला दुखापत झाल्यामुळे डोळ्यातून अश्रू आले.