नवी दिल्ली : रियॅलिटी टेलीव्हिजन स्टार काइनी जेनर आपल्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. गेले काही महिने ती सोशल लाइफपासून थोडी दूर होती. त्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून स्टॉर्मी वेबस्टार असे बाळाचे नाव आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हे बाळ ३ महिन्याचे झाल्यानंतर काइनी आपल्या हॉट अंदाजात परतली आहे.



तिने आपले फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत.



'पीपुल डॉट कॉम'ने यासंदर्भातील वृत्त दिलेय.



यानुसार २० वर्षाची काइलीसोबत तिचे ३ महिन्याचे बाळही दिसतेय. याला एका तासात ३८ लाख ६६ हजार चारशे ६१ लाइक्स मिळाले.


केवळ २० वर्षांची 



काइली केवळ २० वर्षांची असली तरी तिने अमेरिकी टीव्ही जगतात आपली जागा बनविली आहे. मंगळवारी तिच्या मुलीला ३ महिने पूर्ण झाले.



एका फोटोत ती गुलाबी रंगाच्या वन पीस ख्रिश्यन डायर बाथिंग सूटमध्ये दिसते. तिच्या हातात फोन आहे. 'एमआयए' अस कॅप्शन तिनं त्या फोटोला दिलंय. अन्य फोटोंमध्ये ती आपल्या प्रियकरासोबत किंवा बाथटबमध्ये दिसते. या फोटोला तने 'बर्थ डे बिहेवियर' असं कॅप्शन दिलयं.