Nitanshi Goyal: सोशल मीडियात सक्रिय असणाऱ्या तरुणांना नितांशी गोयल हे नाव काही नवीन नाही. 18 व्या वर्षात येण्याआधी तिचे सोशल मीडियात 10 मिलियन म्हणजे 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. आणि आता तर तिला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ती आमिरचा आगामी सिनेमा 'लापता लेडीज'मध्ये हिरोईन म्हणून झळकणार आहे. या सिनेमात ती विवाह करुन सासरी जाताना हरवलेली नवरी दाखवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या नॉएडामध्ये राहणारी नितांशी गोयल आमिर खानसोबत आपल्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरुवात करत आहे. किरण राव दिग्दर्शित हा सिनेमा 2 वधुंवर आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर मोठा पडदा असल्याने त्या ट्रेनमध्ये बदली होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात. यातील एका वधुचा रोल नितांशी गोयलने केलाय. 


12 जून 2007 ला जन्मलेल्या नितांशी तिच्या आगामी सिनेमाबद्दल खूप उत्सूक आहे. लापता लेडीज सिनेमाच्या शूटींग दरम्यान खूप शिकायला मिळाले. माझ्या करिअरसाठी ही खूप मोठी संधी आहे. मी खूप असल्याचे ती सांगते. नितांशी गोयलने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात 2016 मध्ये आलेल्या 'मन मै हे विश्वास' मालिकेतून केली होती. यामध्ये तिने शबरीची भूमिका केली होती. 



माझ्यासाठी मोठी गोष्ट


मी नेहमी माझ्या चाहत्यांच्या संपर्कात असते.  आज माझे 10 मिलियन फॉलोअर्स आहेत. माझ्यासारखी साधारण मुलीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मी माझे चाहते, शुभचिंतकांचे यासाठी आभार मानते. मला लापता लेडीज सिनेमाची कहाणी सांगण्यात आली तेव्हा मी खूपच उत्साहित होते, असेही तिने सांगितले.