नवी दिल्ली : सध्या एका महिला पोलिसाचा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या महिला पोलिसाच्या सौंदर्याविषयी जोरदार चर्चा रंगल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- हरलीन कौर असं या महिलेचं नाव असून ती पंजाब पोलीसमध्ये एसएचओ आहे. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर हा फोटो व्हायरल होत आहे. पण या मागचं सत्य वेगळंच आहे.


- फोटोमध्ये असणारी महिला ही पोलीस कर्मचारी नसून ती एक अभिनेत्री आहे. कायनात अरोरा असं तिचं नाव आहे. जी एका सिनेमामध्ये पोलिसाची भूमिका करत आहे.


- पंजाबमध्ये जग्गा जेऊंदा या सिनेमाचं सध्या शूटींग सुरु आहे. त्यामध्ये अभिनेत्री कायनात ही एसएचओची भूमिका करत आहे.


- यादरम्यान कोणीतरी पोलीस गणवेशात अभिनेत्रीचा फोटो क्लिक केला आणि सोशल मीडियावर ठाकला, जो आता व्हायरल होत आहे.


- 2 डिसेंबर 1986 रोजी कायनातचा जन्म देहरादून येथे झाला. तिचं निकनेम चारू अरोडा आहे.


- 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारचा सिनेमा खट्टा-मीठा या चित्रपटामधून तिने सिनेमात पदार्पण केले होते. 2013 साली ती 'ग्रँड मस्ती' या चित्रपटात दिसली होती.