शितली गावकऱ्यांना आर्मीचं महत्व पटवून देईल का?
भैय्याशी दोन हात करेल शितली?
मुंबई : लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या २१ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात शीतलपासून झाली. शीतल गावकऱ्यांना जवान का बनले पाहिजे याचे महत्व पटवून देते. तिचे बोलणे ऐकून गावकरी सुन्न होतात व काहीच बोलत नाहीत. तीच संधी साधून भय्या साहेब म्हणतात, चांगले भाषण दिलेस आणि असे लोकांच्या पोरांना आर्मीत धाडण्यापेक्षा आधी स्वतःच्या भावाला धाडा की आर्मीत ! तेव्हा शीतल म्हणते आमच्या घरातील पोर डालून ठेवण्यातली औलाद नाही आमची. उद्या जर येऊन माझा भाऊ म्हणाला ना की मला आर्मीत जायचे आहे तर सर्वात आधी मी त्याच्या पाठीशी उभी राहीन. मग म्हणून काय सर्वांनी आर्मीत जायला पाहिजे का असे भय्या म्हणतो. तेव्हा शीतल म्हणते की, जे स्वतःच विचार करतो तो कधीच आर्मीत जात नाही उलट जो देशाचा विचार करतो तोच आर्मीत जातो. व तिथे फक्त वाघाचं लागतात भुंकणाऱ्या कुत्र्यांचे ते काम नाही. हे ऐकून भय्या रागाने लालबुंद होतो. दरम्यान शीतल गावकऱ्यांना विनंती करते की, जर तुमच्या मुलांना मनापासून आर्मीत जायचे असेल तर कृपया त्यांना रोकु नका.
आशिष म्हणतो, शीतल वहिनी बोलतेय ते बरोबर आहे मला आर्मीत जायचे आहे त्याचे बोलणे ऐकून बाकीची मुलेही आर्मीच्या ट्रेनिंगसाठी तैय्यार होतात. काही वेळाने शीतल अज्याला फोन करून सांगते की, उद्यापासून सर्व मुले ट्ट्रेनिंगसाठी यायला तैयार झाली आहेत. ते ऐकून अज्या खुश होतो व शीतलला सांगतो नेहमी जोराने ओरडून सांगायचे की, आज की प्रॅक्टिस मी अकरा पोरं हाजीर थी श्रीमान, तसे बोलून दाखकवायलाही सांगतो. तिकडे शीतल जोराने ओरडते आणि मामी तिच्याकडे बघून दचकतात व मामा जोराने हसू लागतात.
दरम्यान तिकडे भय्या साहेब गावातील काही गावकऱ्यांना एकत्र गोळा करून पुन्हा विक्रमच्या नावाने गावाबाहेर कमान उभी करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवतात. त्याचे बोलणे ऐकून सारेजण तैय्यार होतात. त्यासाठी गावातील सर्वांचे हातभार लागले पाहिजे असे टॅलेंट हुशारीने बोलतो त्यांचा हो ला हो देत जमलेले भय्याच्या विचाराशी सहमत होतात व गावातील घरटीप लोकांकडून प्रत्येकापासून हजार रुपये वर्गणी गोळा करायला सांगतात. भय्यासाहेबांचा वर्गणी गोळा करून विक्रमच्या नावाने कमान उभारण्याचा बेत सफल होईल का हे बघण्यासाठी लागिरं झालं जी या मालिकेचा पुढील एपिसोड बघायला विसरू नका.