मुंबई : मंगळवारपासून फॅशनचा कुंभ अर्थात 'लॅक्मे फॅशन विक'ची सुरुवात झालीय. या फॅशन विकदरम्यान रॅम्प वॉक करताना एखाद्या मॉडेलसोबत छोटासा अपघात होणं, ही बाबही आता सामान्य झालीय... पण, नुकत्याच बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलेल्या 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'ची अभिनेत्री यामी गौतम हिच्यासोबत अपघात झाला तर तो मात्र चर्चेचा विषय ठरतो... 


 सौ. INSTAGRAM@Yamigautam 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लॅक्मे फॅशन विक' म्हणलं की बॉलिवूडमधले चेहरे तर दिसणारच... पहिल्याच दिवशी या रॅम्पवर बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आणि करण जोहर यांनी आपले रंग भरले... तर बुधवारी या रॅम्पवर यामी गौतम सुंदर अशा गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये चालताना दिसली.


पण, यामीसोबतच रॅम्पवर असं काही घडलं की या घटनेचा व्हिडिओ थोड्याच वेळात व्हायरल झाला. यामी या कार्यक्रमात सेलिब्रिटी फॅशन डिझायनर गौरी आणि नैनिका यांच्या शोमध्ये झळकणार होती. पण, रॅम्पवर चालत असताना तिच्या ड्रेसचा पायघोळ तिच्या पायाखाली आला... आणि यामी जागेवरच अडखळली.  



पण, यामीनं हा क्षण अतिशय व्यवस्थितरित्या हाताळला... हसतमुखानं ती पुढे सरकली... आणि रॅम्पवॉक पूर्ण केला. 



यामीच्या या उत्साहाला आणि संयमाला लोकांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. सध्या यामी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात यामीसोबत विक्की कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.