LAL SINGH CHADHHA , AAMIR TROLLED: अभिनेता आमिर खान (Aamir Khan)स्टारर  'लाल सिंग चड्ढा' सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता अडचणी सापडला आहे. एवढंच नाही तर आमिर विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी तर करत आहेत, पण अभिनेत्यावर अनेक आरोप देखील लावत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकताच आमिर खान कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर जाऊन आला यावेळी राष्टगीतादरम्यान आमिरने सॅल्यूट न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या आरोपाचं उत्तर म्हणून आमिरने आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये राष्ट्रधवज फडकवला आहे 


हर घर तिरंगा(har ghar tiranga) अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट प्रत्येकाने घरात तिरंगा लावावा या पंतप्रधानांच्या आव्हानाला आमिरने सुद्धा साथ दिली आणि आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये राष्ट्रध्वज लावला आहे  


२०१५ मध्ये आमिरची एक्स वाईफ किरण राव(kiran rao statement on india) ने एक वक्तव्य केलं होत की, तिला या देशात म्हणजेच भारतात सुरक्षित वाटत नाहीये '' त्याचा परिणाम आमिर खानवर अजूनही होताना दिसत आहे इतकंच नाही तर भारतीय लष्करातील जवानांचा अपमान केल्याचा देखील आरोप त्याच्यावर आहे 


लाल सिंग चड्ढा(lal singh chadhha) प्रदर्शित होऊन ३ दिवस होताहेत पण म्हणावं तसं कलेक्शन सिनेमाला मिळू शकलं नाही.