मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (sushmita sen) आणि आयपीएलचे संस्थापक (Lalit Modi) यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा थांबल्या इतक्यातचं  आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. 15 जुलै रोजी ललित मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर घोषणा केली की, ते आणि सुष्मिता एकमेकांना Dating करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललित यांच्या या घोषणेनंतर जणू एकच खळबळ उडाली होती. सुष्मिता सेनला सोशल मीडियावर प्रचंड troll करण्यात आलं आणि ललित मोदींची खिल्ली उडवण्यात आली. पण आता ललित आणि सुष्मिता यांच्यात काही सुरळीत होत नसल्याचं दिसून येत आहे. आता आम्ही हे का म्हणतोय तेही आम्ही तुम्हाला सांगतो.


ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचा Dp काढला
ललित मोदीने आपल्या twiter आणि instagram वरून स्वतःचा आणि सुष्मिताचा डीपी काढून टाकला आहे आणि स्वतःचा एकट्याचा फोटो टाकला आहे. ज्यानंतर दोघांमध्ये  दुरावा निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.