मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चर्चेचा भाग आहे. सुष्मिताने ललित मोदींसोबतच्या नात्याची घोषणा केल्यापासून ती चर्चेचा भाग बनली आहे. रिलेशनशिपची घोषणा झाल्यापासून सुष्मिता सेन ट्रोलच्या निशाण्यावर आहे. पण तीही चोख प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता तिच्या पोस्टच्या माध्यमातून टीकाकारांना उत्तर देत असते. दरम्यान, सुष्मिताने तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत पार्टी केली आहे. हे पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. नुकताच सुष्मिताने तिच्या आईचा वाढदिवस साजरा केला. रोहमनही याच पार्टीत सामील झाला होता.


सुष्मिता सेनने तिच्या आईचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. आईच्या वाढदिवसानिमित्त सुष्मिताने इन्स्टाग्रामवर लाईव्ह सेशनही केलं होतं. जिथे त्याने आईसाठी दिलेल्या शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मानले. या लाईव्ह सेशनमध्ये चाहत्यांनी सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमनला तिच्यासोबत पार्टी करताना पाहिलं.


डिसेंबरमध्ये ब्रेकअप झालं
सुष्मिता आणि रोहमनने डिसेंबरमध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या आणि रोहमनच्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती. रोहमन आणि सुष्मिता वेगळे झाले असले तरी अभिनेत्रीच्या दोन्ही मुलींसोबत त्याचं खास नातं आहे. रेनी आणि अलिशा या दोघीही रोहमनच्या खूप जवळच्या आहेत.


वृत्तांवर विश्वास ठेवायचा झालं तर सुष्मिताला रोहमन आणि त्याच्या मुलींच्या नात्याबद्दल कोणतीही अडचण नाही. सुष्मिताने यापूर्वी सांगितलं होतं की, रोहमन दोन्ही मुलींसाठी वडिलांसारखा आहे आणि कायम राहील.



सुष्मिताची मोठी मुलगी रैनीने नानीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये फॅमिलीसोबत अनेक फोटो आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहिलं की,  बेस्ट नानीला हॅपी बर्थडे, जिला आम्ही नन्ना म्हणतो.  तु बलवान, दयाळू आहेस आणि तुझं हृदय खूप मोठं आहे. तू आमच्या आयुष्यात आहेस म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत. मला आशा आहे की तुझं हे वर्ष जादुई वर्ष जावो. तु नेहमी निरोगी आणि आनंदी राहा.