Lata Mangeshkar : लतादीदी `त्या` व्यक्तीच्या होत्या प्रेमात! लग्न करायचं होतं पण...
Lata Mangeshkar Birth Anniversary 2023 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाही. पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, त्यांनी लग्न का केलं नाही.
Lata Mangeshkar Birth Anniversary 2023 : गानसम्राज्ञी आणि शास्त्रीय गायक पं दीनानाथ मंगेशकर यांच्या ज्येष्ठ कन्या लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. 28 सप्टेंबर 1929 साली त्यांचा जन्म झाला. संगीत क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवलं. त्यांची असंख्य गाणी आजही चाहत्यांचा मनात घर करुन आहेत. त्यांची ही गाणी आजही अजरामर आहेत. लतादीदींच्या गायकीने वेगळे वळण घेतलं, म्हणजे आवाज अधिक परिपक्व आणि धारदार होता. (lata mangeshkar birth anniversary love story maharaja raj singh of dungarpur)
लतादीदींची चाहते फक्त भारतात नाही अख्खा जगात आहे. त्यांनी कधीही लग्न केलं नाही, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्यांनी हा निर्णय का घेतला होता असा प्रश्न आजही भेडसावत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांचंही एका व्यक्तीवर प्रेम जाडलं होतं. पण त्या व्यक्तीशी त्यांना लग्नही करायचं होतं, पण हे शक्य नव्हतं. कारण त्यांचं प्रेम एका महाराजावर जडलं होतं.
हे महाराज म्हणजे लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचा मित्र होता. जर हे लग्न झालं असतं तर त्या एका राज्याच्या राणी झाल्या असत्या. एवढं मोठं भाग्य असतानाही लतादीदींनी लग्न का केलं नाही? हा प्रश्न त्यांना अनेक मुलाखतीत विचारला गेला. त्यावर त्या कायम एकच सांगायच्या, घरच्या जबाबदारीमुळे लग्न करु शकल्या नाहीत.
कोण होते ते महाराज?
लतादीदी यांना आवडणारे आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं मित्र म्हणजे डुंगरपूर राजघराण्यातील महाराज राज सिंह. ज्यावेळी महाराज राज सिंह मुंबईत लॉ करण्यासाठी आले होते तेव्हा लता दीदी यांची ओळख झाली. अनेक वेळा लतादीदी भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत महाराज राज सिंह यांच्या घरी जात होत्या. लतादीदी यांचं महाराज राज सिंह यांच्यावर प्रेम जडलं, दोघांना लग्न करण्याची इच्छा होती. पण हे लग्न कधी होऊ शकलं नाही.
झालं असं की, महाराज राज सिंह यांच्या कुटुंबियांनी आधीच सांगितलं होतं, महाराज राज सिंह यांचं लग्न कुठल्याही सामान्य मुलीशी होणार नाही. त्यामुळे महाराज राज यांना कुटुंबाच्या शब्दाचं पालन करायचं होतं. पण अशावेळी काय करायचं, कारण लतादीदी आणि महाराज राज सिंह हे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. अशावेळी लतादीदी आणि महाराज राज सिंह यांनी आजीवन अविवाहित राहिले.