Lata Mangeshkar:  गानकोकिळा, गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स (Anushka Motion Pictures & Entertainment) आणि लतिका क्रिएशन्स (Latika Creation) हे लतादिदींवर एक डॉक्युमेंटरी (Documentary) तयार करणार आहेत. सम्राज्ञी असं या डॉक्युमेंटरीचं नाव असून लतादीदींचं जीवनपट यात उलगडणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची मराठीतील ही पहिलाच डॉक्युमेंटरी असणार आहे.  (Lata Mangeshkar Documentary Samradnyee nm )


'सम्राज्ञी' यांना मानाचा मुजरा (Samradnyee)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या डॉक्युमेंटरीचं शिवधनुष्य एल एम म्युझिकचे सीईओ -संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी उचलं आहे. तर ही डॉक्युमेंट्री मयुरेश पै (Mayuresh Pai) हे दिग्दर्शित करत आहेत. स्वरसम्राज्ञीला या कलाकृतीतून मानाचा मुजरा देण्यात येणार आहे. 


याआधी बीबीसीने लता मंगेशकर यांच्यावर माहितीपट तयार केला होता. बीबीसीने तयार केलेला माहितीपट साधारण अर्धातासाचा होता.  पण या माहितीपटाचा विचार करत असताना निर्माते आणि दिग्दर्शक वेळची मर्यादा शिथील करणार आहेत. हा माहितीपट साधारण चार तासांचा असेल अशी माहिती मिळाली आहे. 




28 सप्टेंबर 1929 ला मध्य प्रदेशातील इंदौर (Lata Mangeshkar Birth Place) येथे लतादीदींचा जन्म झाला. संगीत घराण्यात जन्मलेल्या दीदींना आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ अशी लहान भावंडं होतं. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि या भावंडांचे ते गुरू होते. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट लिहून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.