सिनेसृष्टीत भाची परततेय, लता दीदींच ट्विट
लती दीदींच प्रेरणादायी ट्विट
मुंबई : 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आणि श्रद्धा कपूरची मावशी पद्मिनी कोल्हापुरे बराच कालावधीनंतर सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 'पानीपत' सिनेमात पद्मिनी कोल्हापूरेने गोपिका बाईची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून यामध्ये पद्मिनी कोल्हापूरेंची झलक दिसली आहे.
ज्येष्ठ गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पद्मिनी कोल्हापुरेंसाठी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी,'नमस्कार, माझी भाजी पद्मिनी कोल्हापुरे जी उत्तम कलाकार आहे. आता ती पानीपत सिनेमात गोपिका बाईंची भूमिका साकारत आहे. मी पद्मिनीला आशिर्वाद देते आणि आशुतोष, त्याच्या टीमला शुभेच्छा देते.'
या ट्विटमध्ये लता दीदींनी पद्मिनी कोल्हापुरेंचा लूक शेअर केला आहे. पद्मिनी कोल्हापुरे जवळपास 6 वर्षांच्या विश्रांतीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. 'प्रेम रोग' ते 'वो सात दिन' आणि 'विधाता'पर्यंत सगळ्याच सिनेमांच कौतुक झालं आहे.
या अगोदर पद्मिनी कोल्हापुरे यांना 'फटा पोस्टर निकला हिरो' या सिनेमात पाहिलं होतं. 'पानीपत' हा सिनेमा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांचा असून सिनेमात 1761 ची पानीपतची लढाई दाखवण्यात आली आहे. अर्जून कपूर या सिनेमात मराठा योद्धा सदाशिव रावांची भूमिका साकारत आहे.