दीदींना अखेरच्या प्रवासात बहीण आशाची साथ, शेवटचा फोटो डोळ्यात पाणी आणणारा
आशा भोसले यांनी सोडली नाही लता दीदी यांची सोबत
मुंबई : लता मंगेशकर एक असं व्यक्तीमत्व ज्यांना सरस्वती देवीचा दर्जा देण्यात आला होता. ९२ व्या वर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांचा अखेरचा प्रवास तिरंग्यातून झाला. रविवारी सायंकाळी लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यविधी अगोदर लता मंगेशकर यांचा शेवटचा फोटो चाहत्यांसमोर आला आहे.
लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून शिवाजी पार्कपर्यंत निघाली होती. यावेळी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाजवळ ज्येष्ठ गायिका आणि लता दीदी यांची बहिण आशा भोसले होत्या.
लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन सख्ख्या बहिणींनी करोडो प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं.
हृदयनाथ मंगेशकर यांना त्यांच्या उत्कृष्ट गाण्यांसाठी आणि संगीतासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
भीमसेन जोशी आणि जसराज यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र शासनाने पंडित ही पदवी देऊन गौरविले. याशिवाय हृदयनाथ मंगेशकर यांना 2009 साली पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.