मुंबई : स्वर्गीय गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या जीवनाशी निगडित असे अनेक किस्से आहेत. असाच एक किस्सा लता मंगेशकर यांच्या लग्नाचा आहे. लता मंगेशकर यांनी कधीही लग्न केलं नाही ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. त्या आयुष्यभर कुमारी राहिल्या आणि गाणं हेच त्यांचं पहिलं प्रेम होतं. पण बॉलीवूडचा असा एक सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता होता जो लता दीदींचा खूप आवडायचा. इतकंच नाही तर त्यांना त्यांच्याशी लग्न करायचं होतं. पण लता दीदींसाठी ते शक्य होऊ शकलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर ही गोष्ट आहे. त्या दिवसांमधली, जेव्हा लता मांगेकर अगदी लहान होत्या आणि के.एल.सहगल यांची गाणी वडिलांसोबत ऐकायच्या. वडिलांसोबत  रियाज करताना केएल सेहगल यांची गाणी लताताई नेहमी ऐकायच्या. गायकाचा आवाज लता मंगेशकर यांना इतका आवडला की, त्या मोठ्या झाल्यावर त्यांच्याशी लग्न करू इच्छित होत्या. खुद्द लता ताईंनीही एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.


लता ताई म्हणाल्या होत्या, 'माझ्या आठवणीनुसार मला केएल सहगलला भेटायचं होतं. मी म्हणायचे की, मी मोठी झाल्यावर त्यांच्याशी लग्न करेन. तेव्हा वडील मला समजवायचे की, तुझं लग्न करण्याचं वय होईपर्यंत सहगल साहेब म्हातारे होतील. दुःखाची गोष्ट म्हणजे लता मंगेशकर यांची के.एल. सहगल यांची कधीच भेटही होऊ शकली नाही.


लता दीदी पुढे म्हणाल्या की, 'मी त्यांना कधीही भेटू शकले नाही याचं मला नेहमीच दुःख असेल. पण नंतर त्यांच्या भावाच्या मदतीने मी त्यांची पत्नी आशाजी आणि मुलांना भेटले ज्यांनी मला के.एल. सहगल साहेबांची अंगठी भेट दिली होती.



त्या काळात लता मंगेशकर यांनी स्वत:साठी रेडिओ विकत घेतला होता. असं म्हणतात. जेव्हा त्यांनी रेडिओ चालू केला. तेव्हा त्यांना के.एल. सहगल यांच्या निधनाची बातमी कळली. आपल्या आवडत्या गायकाच्या निधनाची बातमी ऐकून लता दीदींना धक्का बसला.