मुंबई : सुरांची राणी, सुरांची कोकीळा अशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची ओळख आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मोठं योगदान असलेल्या लता मंगेशकर यांचा वाढदिवस. आतापर्यंत हजारो गाणी त्यांच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आली आहेत. लता दीदींना गाण्याचा वारसा मिळाला त्यांच्या वडिलांकडून. लता दीदींनी वडील  दीनानाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शानाखाली संगीताचे धडे गिरविले. पंडित दीनानाथ मंगेशकर मराठी संगीतकार, शास्त्रीय गायक आणि थिएटर अभिनेते होते, तर दीदींच्या आई गुजराती होत्या. जेव्हा लता मंगेशकर यांचे वडील वारले तेव्हा त्या फक्त 13 वर्षांच्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लता दीदींनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. पण आज त्या एकट्या कोट्यवधी रूपयांच्या मालक आहे.  Trustednetworth.com च्या रिपोर्टनुसार त्यांच्याकडे जवळपास 3698 कोटी रूपयांची संपत्ती आहे. लता दीदी दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर असलेल्या प्रभु कुंज भवनात राहतात. 



एका रिपोर्टनुसार, लता मंगेशकर कारप्रेमी आहेत. त्यांच्याकडे शेवरलेट, ब्यूक आणि क्रिसलरच्या या महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. दीदींबद्दल सांगायचं झालं तर, लता मंगेशकर... तमाम भारतवासियांसाठी एक अभिमान, आदर आणि स्फूरणंही... वयाच्या तेराव्या वर्षापासून सुरू झालेली लतादीदींची ही सांगितिक सफर.. ‘ब्लॅक अँन्ड व्हाईट’ सिनेमाचा जमाना असो की कलरफुल सिनेमांचा. या जादूई स्वरांची मोहिनी तमाम रसिक मनावर नेहमीच राज्य करून राहिली.