मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील सुपरहिट 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गायलेली पश्चिम बंगालमधील रानू मारिया मंडल ही महिला रातोरात प्रसिद्ध झाली. २ मिनिटांच्या एका गाण्याने रानूचं आयुष्यचं बददलं. आता ५९ वर्षीय रानूला अनेक कार्यक्रमांतून ऑफर येत आहेत. पण रानूला सर्वांत मोठी भेट तिच्या मुलीकडून मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रानू मंडल आणि तिच्या मुलीचा गेल्या १० वर्षांपासून काहीच संपर्कच नव्हता. पण रानूच्या या व्हायरल व्हिडिओने आई-मुलीची भेट घडवून दिली. एका दशकानंतर रानूची मुलीशी भेट झाल्यानंतर तिने 'हे माझं दुसरं आयुष्य आहे आणि मी याला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करेल' असं म्हटलंय.


रानूला रेडिओ चॅनेल, फिल्म प्रोडक्शन हाऊस आणि लोकल क्लबमधूनही कॉल येत आहेत. रानूचा २ मिनिटांचा व्हिडिओ पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातील राणाघाट स्टेशनवर एका प्रवाशाने रेकॉर्ड केला होता. सोशल मीडियावर रानूचा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिचं आयुष्यच बदललंय.


लता दीदींनाही या महिलेचं गाणं ऐकायला आवडेल...


एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, रानूला रिअॅलिटी शोच्या निर्मात्याकडून फोन आला आहे. तिच्यासाठी विमानाच्या तिकीटाचीही सोय करण्यात आली. पण रानूचं ओळखपत्र, संबंधित कागदपत्रं नसल्याने तिच्या हातून ऑफर गेल्याचं बोललं जात आहे.


लता मंगेशकरांचं एक गाण गायल्याने आयुष्य बदललं...पाहा आता ओळखणंही कठीण


एका व्हायरल व्हिडिओनंतर आता रानूचं विलक्षण ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. रानूचा हा मेकओवर एका शोच्या एक्झिक्यूटिव्हने स्पॉन्सर केल्याची माहिती आहे.