लता मंगेशकरांचं एक गाण गायल्याने आयुष्य बदललं...पाहा आता ओळखणंही कठीण

Aug 08, 2019, 20:24 PM IST
1/6

आजच्या जगात सोशल मीडिया हे इतकं प्रभावी माध्यम झालं आहे की, काही लोक एका रात्रीतच प्रसिद्ध झाले. तर या सोशल मीडियामुळे काही लोकांचं आयुष्यच बदललं आहे. असंच काहीसं पश्चिम बंगालमधील रानूसोबत झालं आहे. 

2/6

स्टेशनबाहेर आपल्या जबरदस्त आवाजात लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाणं रानूने गायलं. या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रानूला आता अनेक प्रसिद्ध कार्यक्रमांमधून ऑफर येत आहेत. एका व्हायरल व्हिडिओनंतर आता रानूचं विलक्षण ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे.

3/6

एका रिपोर्टनुसार, रानूचा हा मेकओवर एका शोच्या एक्झिक्यूटिव्हने स्पॉन्सर केल्याचं बोललं जातंय. रानूला एका शोसाठी मुंबईतही बोलण्यात येणार असून तिचा प्रवासाचा खर्चही केला जाणार आहे. पण, सध्या रानूकडे आवश्यक तो पास, कागदपत्रं नसल्याने तिला प्रवास करण्यास परवानगी देण्यात अडचणी येत आहेत. 

4/6

रानूचा हा मेकओवर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेकओवरनंतर ती अतिशय उत्साही वाटत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रानूने बबलू मंडलसह मुंबईत लग्न केलं होतं. पण पतीच्या निधनानंतर ती पुन्हा पश्चिम बंगालमधील रानाघाटमध्ये आली. ती दररोज रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांसाठी गाणं म्हणून आपला गुजराणा करत होती. 

5/6

रानूने ताला-सूरात अतिशय कठिण वाटणारीही अनेक गाणी अगदी सहजतेने गायली आहेत. रानूने लता मंगेशकर याचं 'एक प्यार का नगमा है' गायलं होतं. हे गाणं गातानाचा व्हिडिओ एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तो जबरदस्त व्हायरल झाला होता. रानूने गायलेल्या या गाण्याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली होती.

6/6

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला रानूचा व्हिडिओ राणाघाट स्थानकातील असल्याचं बोललं जात आहे. रानूच्या या व्हायरल व्हिडिओला जवळपास २.४ मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४६ हजारहून अधिक लोकांनी तो व्हिडिओ शेअर केला आहे.