मुंबई : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते. पण आज अखेर 29 दिवसांची झुंज संपली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युग संपलं.... असं ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. 



नितीन गडकरी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. 




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या त्यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्ये होत्या. 


प्रकृती पुन्हा एकदा खालावल्यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर 24 तास लता दीदींवर लक्ष ठेवून होते.