मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री इलियाना डिक्रुज ही अभिनेत्री चर्चेचा विषय बनली आहे. नुकताच तिचा बॉयफ्रेंड एंड निबोनने  इलियानाचा इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये इलियाना बाथटबमध्ये झोपलेली दिसत आहे. या फोटोनंतर सोशल मीडियामध्ये इलियाना गरोदर असलेली चर्चा रंगली होती. 


इलियानाचा खुलासा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर इलियाना डिक्रुजच्या गरोदरपणाच्या चर्चा रंगल्यानंतर या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. इलियानाने इस्टाग्रामवर ती गरोदर नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सोबतच तिने दोन फोटो शेअर केले आहेत. 


 




 


 


इलियानाच्या दोन खास पोस्ट 


इलियानाने इंस्टाग्रामवर दोन पोस्ट लिहल्या आहेत. त्यामध्ये लिहलेल्या कॅप्शनमधून तिने चाहत्यांना खास सल्लादेखील दिला आहे. इलियानाने लिहलेल्या पोस्टनुसार, 'चांगल्या गोष्टींना तुमच्यामध्ये समाविष्ट करा आणि वाईट गोष्टींना बाहेर फेका.' तर दुसर्‍या पोस्टमध्ये बॉयफ्रेंडला टॅग करून #NotPregnanat असं तिने लिहलं आहे. चाहत्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही तिने स्पष्ट केलं आहे. 


 


बॉयफेंडचा उल्लेख 'हबी' 


इलियानाने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तिने बॉयफ्रेंड एंडचा उल्लेख 'हबी' असा केला होता. तेव्हा इलियाना एंडसोबत लग्नबंधनात अडकल्याची बातमी पसरली होती. मात्र इलियानाने याबाबत कोणतीही महिती देण्यास नकार दिला.