राज कपूर यांच्यासोबत शम्मी कपूर यांच्या मुलाने का ठेवला होता दुरावा? कारण आलं समोर...
Aditya Raj Kapoor: राज कपूर यांची आज 100वी जयंती आहे. कपूर कुटुंबाकडून मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
Aditya Raj Kapoor: भारतीय चित्रपटसृष्टीचे 'शो मॅन' राज कपूर यांची आज जन्मशताब्दी आहे. निर्माते-दिग्दर्शक-अभिनेता म्हणून त्यांनी एक काळ गाजवला आहे. राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबीय आज 14 डिसेंबर रोजी एखा खास सोहळ्याचे आयोजन करत आहे. यानिमित्ताने बॉलिवूड व चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. इतकंच नव्हे तर, कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदींनादेखील या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दिग्गज दिवंगत अभिनेता शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य राज कपूर यांने राज कपूर यांच्या कुटुंबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
आदित्य राज कपूर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे काका राज कपूर यांच्याबाबत व त्यांच्या कुटुंबाबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. आदित्य यांनी म्हटलं आहे की, त्यांनी राज कपूर आणि रणधीर कपूर यांच्यापासून लांब राहणेच पसंत केले आहे. कारण मला असं वाटतं की, मी कुटुंबाचा वारसा पुढे चालवू शकत नाही. ETimes सोबत बोलताना आदित्य यांनी हे मत मांडले आहे. ते पुढे म्हणतात की, 'राजसाहेब एक सिनेमॅटिक कवी असून त्यांनी चित्रपटातून रोमान्स आणि सामाजिक मुद्द्यांचे चित्रण करण्याची पद्धत बदलली.'
आजच्या सिनेमात जे काही बदल झाले आहेत. मग ते स्क्रिप्ट असो, एडिटिंग असो किंवा दिग्दर्शन असो या सगळ्याचे श्रेय राज कपूर यांना जातं. ज्यांनी अंधारातून पुढे येऊन स्वप्न पाहण्याची हिंमत दाखवली. त्यांचे दिग्दर्शन आणि मार्गदर्शनाखाली भारतीय सिनेमा पूर्णपणे बदलला आहे, असं आदित्य राज कपूर यांनी म्हटलं आहे.
राज कपूर यांच्यासोबत व्यतित केलेल्या वेळेबद्दल सांगताना ते म्हणतात की, मी काही वर्षांपूर्यंत RK स्टुडियाजमध्ये रणधीर कपूर आणि राज साहेबांसोबत काम केलं आहे. आज भलेही मी शिष्य स्टीवन स्पीलबर्ग यांच्यासोबत काम करत असेल तरीदेखील राज कपूर यांनी तयार केलेल्या व्यासपीठाशी मी जुळवून घेऊ शकत नाही. आज कॉम्युटर तंत्रज्ञानसारख्या सुविधा आहेत. राज कपूर यांनी सामान्य गोष्टींमध्ये सौंदर्य शोधून सर्वसाधारण गोष्टीलाही खास बनवले.
शशि कपूर आण राज कपूर यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा चित्रपटाचा वारसा पुढे चालवला पण शम्मी कपूर यांचे कुटुंब मीडियापासून लांबच आहे, याचे कारण काय, असा प्रश्न आदित्य यांना विचारला असता, त्यांनी म्हटलं की, मी स्वतःहूनच हा दुरावा तयार केला आहे. कित्येक वर्षांपर्यंत राज अंकल आणि रणधीर यांनादेखील भेटलो नाही. यामागे माझी काही कारणे आहेत. राज अंकल यांनी जे काही केलं त्यांनी सिनेमाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला. आता मी यात नवीन काय करु शकतो?