कांद्यावर काळे डाग दिसतायेत? ही गोष्ट काय आहे आणि ती खाण्यामुळे काही नुकसान आहे का? जाणून घ्या

तुम्हाला कांद्यावर अनेकदा काळे डाग दिसले असतील. त्याला स्पर्श केल्यावर ते पावडरसारखे हाताला चिकटतात. ही गोष्ट काय आहे आणि ती खाण्यामुळे काही नुकसान आहे का? जाणून घ्या

| Dec 14, 2024, 09:20 AM IST

Onion black Fungus: तुम्हाला कांद्यावर अनेकदा काळे डाग दिसले असतील. त्याला स्पर्श केल्यावर ते पावडरसारखे हाताला चिकटतात. ही गोष्ट काय आहे आणि ती खाण्यामुळे काही नुकसान आहे का? जाणून घ्या

1/8

Onion black Fungus: तुम्हाला कांद्यावर अनेकदा काळे डाग दिसले असतील. त्याला स्पर्श केल्यावर ते पावडरसारखे हाताला चिकटतात. ही गोष्ट काय आहे आणि ती खाण्यामुळे काही नुकसान आहे का? जाणून घ्या

2/8

जवळपास प्रत्येकाच्या घरात कांदा वापरला जातो. ग्रेव्ही बनवताना साधारणपणे कांद्याचा वापर केला जातो. याशिवाय आपण कोशिंबिरीत कच्चा कांदा खातो आणि चव वाढवण्यासाठी तो भाज्यांमध्ये घातला जातो.

3/8

कांदा हा भारतीय स्वयंपाक घरातील अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे.  याशिवाय कांदा खाण्याचे अनेक फायदेही आहेत. कच्चा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.  रोगप्रतिकार शक्ती ते हृदय निरोगी राहण्यासाठी कांदा फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत कांदा हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे.  

4/8

पण तुम्ही कधी कधी कांद्यावरचे काळे डाग पडलेले दिसतात.  असे डाग कधी वरच्या बाजूला तर कधी कांद्याच्या आतही दिसतात. ते डाग थोडेसे चोळले तर निघून जाते.  

5/8

ही एक प्रकारची बुरशी असते. कांद्यावर आढळणारी ही काळी बुरशी खरेतर एस्परगिलस नायजर आहे. या प्रकारची बुरशी जमिनीत आढळते. त्यामुळे काळ्या बुरशीसारखे आजार होत नसले तरी ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे.  

6/8

या प्रकारची बुरशी असलेल्या कांद्यामुळे ऍलर्जी होऊ शकते, विशेषत: ज्यांना आधीच ऍलर्जी आहे त्यांनी या प्रकारचा कांदा कधीही खाऊ नये, अन्यथा स्थिती बिघडू शकते.

7/8

या प्रकारचा कांदा विशेषतः दम्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी हानिकारक असू शकतो. त्यामुळे कांद्याचे एक किंवा दोन थर खाणे चांगले. काही अभ्यासातून असेही दिसून आले आहे की या बुरशीमुळे डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी, अतिसार इत्यादी समस्या उद्भवू शकतात. फ्रिजमध्ये कांदा ठेवणेही टाळावे.   

8/8

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)