मुंबई: #MeToo या मोहिमेविषयी आता अनेक दिग्गजांनीही त्यांची मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार पाहता याचा विरोध झालाच पाहिजे असंच सर्वांचं मत ठरत आहे. अशा या चळवळीविषयी आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही आपलं मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आयएएनस'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. 


महिलांशी कोणीची चुकीच्या पद्धतीने वागू नये आणि जर कोणी तसं वागलंच तर मात्र त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे असं मत त्यांनी माडंलं. 


कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा आदर केलाच गेलाच पाहिजे. त्यांना अपेक्षित वागणूक ही मिळालीच पाहिजे. जर असं होत नसेल तर, मात्र  महिलांशी चुकिच्या पद्धतीने वागणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला गेला पाहिजे, असं ठाम मत त्यांनी मांडलं. 


सध्याच्या घडीला संपूर्ण कलाविश्वात याच चळवळीला उधाण आलं असून, आता त्यात लता दीदींनी अतिशय महत्त्वपूर्म भूमिका मांडल्यामुळे अनेकांचच याकडे लक्ष वेधलं गेलं आहे. 


अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले, ज्यानंतर बॉलिवूडमध्ये किंबहुना संपूर्ण देशभरात #MeToo ची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच लैंगिक शोषणाचा विरोध करत अशी दुष्कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही केली. अनेक प्रसिद्ध अभिनेते, निर्माते- दिग्दर्शतकांवरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. 


येत्या काही दिवसांमध्ये आता या सर्व प्रकरणाला नेमकं कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.