थलपती विजयच्या `लिओ`नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये `गदर 2` आणि `जेलर`ला पछाडलं
Leo Box Office Collection Thalapathy Vijay beates Gadar 2 and Jailer : थलपती विजयच्या लियो या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कलेक्शनमध्ये टाकलं `गदर 2` आणि `जेलर`ला मागे!
Leo Box Office Collection Thalapathy Vijay beates Gadar 2 and Jailer : दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयचा नुकताच लिओ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीपासून प्रेक्षकांमध्ये त्याची उस्तुकता होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच त्याची आगाऊ बूकिंग सुरु झाली होती. एका आठवड्यात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा गल्ला केल्याचं म्हटले जाते. फक्त थलपती नाही तर त्याआधी देखील अनेक कलाकारांनी इतकी चांगली कमाई कमी वेळात केली आहे. तर थलपती विजयच्या लिओयनं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' आणि 'जेलर' ला मागे टाकले आहे.
चित्रपटानं भारतात 250 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटानं सनी देओलच्या 'गदर 2' आणि 'जेलर' ला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. लोकेश कनगराजच्या सिनेमॅट्रिक यूनिव्हर्सच्या या चित्रपटानं सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' ला मागे टाकले आहे. लियोनं आगाऊ बूकिंगमध्ये 'जवान' आणि 'पठाण' सारख्या चित्रपटांना मागे टाकले होते. तर आता 'गदर 2' ला देखील मागे टाकले आहे. ट्रेड अॅनालिस्ट निशित शॉ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लियो'नं यूकेमध्ये 'गदर 2' ला मागे टाकले आहे. चित्रपटानं जवळपास 13 कोटी 60 लाख कमावले. युकूमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत हा चौथ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर शाहरुख खानचा 'पठाण', दूसऱ्या क्रमांकावर 'जवान' आणि तिसऱ्या क्रमांकावर रणवीर सिंह आणि आलिया भट्ट स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हे चित्रपट आहेत. 'लियो'नं 6 दिवसात यूकेमध्ये केलेल्या कमाईनं 'गदर 2' ला मागे टाकले आहे. याशिवाय त्यानं 'जेलर', 'पोन्नियिन सेलवन 2', 'वारिसु' आणि 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाला मागे सोडले आहे.
हेही वाचा : 'पाच वर्षात लग्न आणि मुलंबाळं...', 36 वर्षीय कंगना रणौतनं सांगितला Wedding प्लॅन
वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई
'लियो' नं 6 दिवसात वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर 458.80 कोटींची कमाई केली आहे. तर सातव्या दिवशी 470 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. 'लियो' या चित्रपटात थलपति विजयशिवाय संजय दत्त, त्रिशा कृष्णन, अर्जुन सरजा आणि प्रिया आनंद यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर चित्रपटात कमल हासन, कार्ती आणि सूर्या यांच्या पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे.