`तुझा प्रायव्हेट पार्ट स्पर्श करु दे` बॉलिवूड अभिनेत्याची धक्कादायक आपबिती
आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. अनेकांनी याबाबत अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. नुकताच अभिनेत्याने त्याच्या कास्टिंग काऊचचा भयानक आलेल्या अनुभवाबाबत सांगितलं आहे.
मुंबई : आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. अनेकांनी याबाबत अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. यातच आता बालिका वधू आणि उडारिया फेम अभिनेत्याने त्याच्या कास्टिंग काऊचचा भयानक आलेल्या अनुभवावर सांगितलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉस 16 फेम अंकित गुप्ता आहे. या अभिनेत्याला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. या अभिनेत्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला.
ही घटना त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना असल्याचं त्याने म्हटलं. हा सगळा प्रकार जेव्हा घडला तेव्हा त्याला जबर धक्का बसला आणि सिनेसृष्टीतून त्याने त्याची पावले मागे घेण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हेतर तो पुढे म्हणाला की, शारिरीक संबध ठेवण्यावर त्याने म्हटलं की, 'मी त्याला म्हणालो की, मी तशा मुलांपैकी नाही आणि मी हे करु शकणार नाही.' पुढे अभिनेता म्हणाला, त्याने मला सांगतिलं की, ठिक आहे हे तुला नाही करायचं. मात्र मला तुझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करु दे वरच्यावर तर वरच्यावर. मला हे ऐकून धक्का बसला आणि मी तेव्हा स्वत:ला विचारलं हे सगळं काय होत आहे माझ्यासोबत''
एका मुलाखतीत अंकिताने कास्टिंग काऊचचा त्याला आलेल्या अनुभवाविषयी धक्कादायक वक्तव्य करत सांगितलं की, ''मी अशा-अशा लोकांना भेटलो आहे की, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. अशी लोकं असतात जी तुम्हाला ऑफर सहित बोलवतात. ते तुम्हाला बऱ्याच कहाण्या सांगतात आणि बरीच नावं घेतात. त्याला मी तुझ्याबद्दल सांगितलं आहे. मी याला लॉन्च केलं आहे. मी त्याला लॉन्च केलं आहे. ते तुम्हाला समजवण्यासाठी काहीही सांगतील कोणत्याही थराला जातील.''
कास्टिंग काऊचबाबत घडलेल्या घटनेबाबत धक्कादायक वक्तव्य करत अंकिंतने नाराजी व्यक्त केली. काम देण्याच्या नावाखाली त्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कसा दबाव टाकण्यात आला. याविषयी तो व्यक्त झाला. याचबरोबर त्याला सांगण्यात आलं की, 'प्रत्येकजण या इंडस्ट्रीत येण्यासाठी असं करतो. अंकित तुला या इंड्स्ट्रीत काम करायचं असेलं तर अशा प्रकारच्या गोष्टी कॉमन आहेत त्या कराव्याच लागतात. जरी तु आता हे केलं नाहीस तर तु २-३ वर्षाने येशील आणि म्हणशील आता करा कारण आता मला इंडस्ट्रीत आणखी स्ट्रगल करायचा नाही आणि माझा वेळही वाया घालवायचा नाही. या वक्तव्यामुळे अंकित पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.