चक्क, या मॉडेल्सनी केला तब्येल्यात रॅम्प वॉक (फोटोज)
फॅशन विश्व हे एक ग्लॅमरस असं विश्व आहे...
मुंबई : फॅशन विश्व हे एक ग्लॅमरस असं विश्व आहे...
इथे नेमकं कधी कुणाला काय करायला लागेल? याची खात्री देता येत नाही. या फॅशन जगतातील मॉडेल आणि त्यांच विश्व यावर बॉलिवूडने अनेक सिनेमे केले देखील. मात्र खऱ्या आयुष्यातील MTV वरील काही मॉडेलला काय करायला लागलं? हे वाचलात, पाहिलात तर चकीत व्हाल. या मॉडेल्सना चक्क म्हशींच्या तब्येल्यात रॅम्प वॉक करायला लावला आहे.
INTM S03 म्हणजे इंडियाच नेक्स्ट टॉप मॉडेलच्या तिसऱ्या सिझनमध्ये चक्क मॉडेल्सना एका तबेल्यात रॅम्प वॉक करायला सांगितला. या मॉडेल्सने अगदी बिधनास्तपणे या म्हशींच्या तब्येल्यात रॅम्प वॉक केला आहे. त्याचे फोटो सध्या चर्चेचा विषय आहेत. पाहा याचे खास फोटो
या INTM S03 मध्ये या मॉडेल्सने लोकप्रिय मॉडेल मलायका अरोरा आणि मॉडेल मिलिंद सोमण देखील फोटोशूट केलं आहे. एमटीव्हीवरील हे सिझन अतिशय लोकप्रिय ठरलं.