मुंबई : सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा चित्रपट यंदाच्या नाताळमध्ये रिलीज होणार का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पद्मावतीनंतर आता सलमानचा टायगर जिंदा है चित्रपटही सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी 'पद्मावती'ला सर्टिफिकेट दिलेलं नाही. सलमान आणि कटरीनाच्या चित्रपटालाही अशाच प्रकारे अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टायगर जिंदा है' २२ डिसेंबरला रिलीज होणार असल्याचं निर्माता-दिग्दर्शकांनी सांगितलं आहे. तब्बल ५ वर्षानंतर सलमान-कतरिनाची जोडी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.


सेन्सॉर बोर्डाच्या नव्या नियमांचा फटका सलमानच्या चित्रपटाला बसू शकतो. कोणताही चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून पास करायचा असेल तर रिलीज आधी ६८ दिवस आधी चित्रपटाची कॉपी पाठवावी लागते. रिलीजच्या तारखेवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्डानं हा निर्णय घेतला आहे.


पद्मावती या चित्रपटाचे प्रदर्शन अनिश्चित काळासाठी टळलं आहे. त्यानंतर आता सलमानचा टायगर जिंदा है चित्रपटही अडचणीत येऊ शकतो. आम्ही प्रक्रियेचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. वाद घालण्याऐवजी समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रसून जोशींनी दिली आहे.