ब्रेकअपनंतर मानसिक त्रासावर प्रियांका चोप्रा काय म्हणाली पाहा
प्रेम करणं सोपं असतं, पण ते जपणं खूप कठिण असतं.
मुंबई : प्रेम करणं सोपं असतं, पण ते जपणं खूप कठिण असतं. अनेक कारणांमुळे कपलमध्ये भांडणं होतात. मग त्यांच्याकडे ब्रेकअप करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. मात्र, विभक्त होण्याचा निर्णय घेणं कपलसाठी अत्यंत दुःखद असतं. जोडीदाराची सवय झाल्यानंतर त्याच्याशिवाय जगणं खूप कठीण होऊन बसतं. अनेकदा लोक स्वतःला डिप्रेशनमध्ये जाण्यापासून रोखू शकत नाहीत. असंच काहीसं इंटरनॅशनल आयकॉन प्रियांका चोप्रानं सांगितलं आहे. जेव्हा ती ब्रेकअपनंतर स्वतःला विसरली होती.
प्रियांका चोप्राने तिच्या 'अनफिनिश्ड' या पुस्तकात तिच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तिने लिहीलं की, 'मी एका अद्भुत माणसासोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. पण ब्रेकअपनंतर मी स्वतःला कसं हरवलं ते मला कळलंच नाही. मला खूप थकल्यासारखं, निराश आणि हताश वाटत होतं. एवढ्या दु:खात मी कधी पोहचले ते मला समजलंच नाही. ब्रेकअपनंतर प्रियांकाला जसं वाटलं तसंच, ती एकटीच नाहीये. तर, जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतर अनेकांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो.
करिअरमध्ये मागे पडणं
वैयक्तिक आयुष्यात जेव्हा-जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा त्याचा थेट परिणाम त्या व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर होतो. प्रियांकाने कदाचित तिच्या दुःखाचा तिच्या करिअरवर परिणाम होऊ दिला नसेल. मात्र बहुतेक लोकांसाठी, ब्रेकअपनंतर प्रोफेशनल जीवनात संतुलन राखणं कठीण होतं आणि ते त्यांच्या करिअरमध्ये मागे राहतात.
स्वतःला दोष देणं
कोणतंही नातं संपुष्टात आलं की, सगळ्यात जास्त त्रास जोडीदारांनाच होतो यात काही शंका नाही. नात्याचा शेवट कोणीही करू शकतं? पण जेव्हा दोन माणसं नात्यात अडकतात, तेव्हा त्यातील समस्या हाताळता न येण्याची जबाबदारी दोघांची असते.
सगळंकाही संपलं आहे असं समजा
ब्रेकअप झाल्यानंतर माणसाला स्वत:ला सांभाळणं खूप अवघड होऊन बसतं. त्याला असं वाटू लागतं की, त्यांचे शरीर सुन्न झालं आहे आणि त्याच्या आयुष्यात काहीच उरलं नाही. यामुळेच तुमच्या आयुष्यातून त्या खास व्यक्तीच्या अचानक जाण्याने तुम्हाला खूप एकटं वाटू लागतं. या मानसिक तणावामुळे डिप्रेशनची समस्या तर सुरू होतेच. पण त्याचा परिणाम व्यावसायिक जीवनावरही होतो.
वाईट सवयींकडे ओढलं जाणं
एखाद्या खास व्यक्तीला गमवल्यावर अनेकवेळा माणसांची अवस्था तलावातून काढलेल्या माशासारखी होते. अशा परिस्थितीत ते अनेकदा चुकीची संगत किंवा वाईट सवयी लावतात. ज्यामध्ये सिगारेट किंवा ड्रग्सचं सेवन समाविष्ट असू शकतं.