मुंबई : अभिनेत्री लीसा रेने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. लीसाने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर या गोष्टी शेअर केल्या आहेत. आणि सांगितलं आहे की, मी आता जुळ्या मुलांची आई झाली आहे. या फोटोंमध्ये लीजा आपल्या दोन्ही मुलींसोहत दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीसाने आपल्या एका मुलीचं नाव 'सूफी' आणि दुसऱ्या मुलीचं नाव 'सोलेल' ठेवलं आहे.  हा सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरोगसीच्या माध्यमातून या दोन्ही मुलींचा जन्म झाला आहे. लीसाचं वय 46 वर्षे असून तिने कॅन्सरवर मात केली आहे. सध्या लिसा अत्यंत आनंदात दिसत आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, लीसाला आई झाल्यावर अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागत आहे. 



तसेच ती म्हणाली की, आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला आता मुलींकडे लक्ष द्यायचं आहे. माझं आयुष्य आता पूर्णपणे बदललं आहे. पण मला यात आनंद मिळत आहे.