गायिका कार्तिकी गायकवाड झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म
कार्तिकी गायकवाडने तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. कार्तिकी गायकवाड आई झाली आहे.
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटील चॅम्पमधून छोट्या पडद्यावरील गाण्याचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ला ओळखले जाते. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणून कार्तिकी गायकवाडला ओळखले जाते. तिने तिच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आता कार्तिकी गायकवाडने तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. कार्तिकी गायकवाड आई झाली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.
2020 साली कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसेने लग्नगाठ बांधली. रोनित पिसे एक बिझनेसमन आहे. रोनित इंजिनिअर असून तो मुळचा पुण्याचा आहे. रोनित उत्तम तबलावादक आहे. त्याला संगिताची खूप आवड आहे. सध्या गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते.
लग्नाच्या चार वर्षांनी आता कार्तिकी आणि रोनितच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. काही दिवसांपुर्वी कार्तिकीने डोहाळे जेवणाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडीओत कार्तिकीच्या डोहाळे जेवणाची जय्यत तयारी पाहायला मिळाली होती. यात कुणीतरी येणार येणार गं असे लिहिलेली एक भव्य रांगोळीही पाहायला मिळली होती. कार्तिकीने तिच्या नवऱ्यासह ग्रँड एंट्री घेतली होती. हा व्हिडीओ शेअर करत कार्तिकीने चाहत्यांना ती आई होणार असल्याची गुड न्यूज दिली होती.
कार्तिकी गायकवाड व रोनित पिसे यांना मुलगा झाला आहे. ही आनंदाची बातमी शेअर करत गायिका लिहिते, “इट्स अ बॉय…माझ्या गोंडस बाळाच्या आगमानाने मी खूपच आनंदी आहे. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.” कार्तिकीने गुडन्यूज दिल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
कार्तिकीने बाळाचा जन्म होण्याआधी “जे कुणी होईल मुलगा किंवा मुलगी त्या बाळाचं आरोग्य उत्तम असावं आणि त्या बाळाकडून घरातल्यांची, मोठ्यांची, देशाची, धर्माची सगळ्यांची सेवा होवो. बाळ सुसंस्कृत होवो. आमच्यापरीने आम्ही त्याला किंवा तिला खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करू आणि मुलगा होणार की मुलगी यापेक्षा ते जर गाण्याच्या क्षेत्रात आलं तर मला जास्त आनंद होईल” अशी इच्छा व्यक्त केली होती.