मुंबई : 'ही चाल तुरु तुरू....' या गाण्यासह, 'कप साँग' सादर करत त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या Mithila Palkar मिथिला पालकर हिने पाहता पाहता या कलाविश्वात आपलं स्थान भक्कम केलं. 'लिटील थिंग्स', 'मुरांबा', 'कारवाँ' अशा कलाकृतींच्या माध्यमातून झळकणाऱ्या मिथिलाने चित्रपट आणि वेब सीरिजच्या दुनियेक लोकप्रियता मिळवली. तरुणाईच्या गळ्यातील ताईत होत मिथिला खऱ्या अर्थाने सर्वांच्याच मनाचा ठाव घेत आहे. अशा या मिथिलाच्या मनावर कोणाचं राज्य आहे किंबहुना तिच्या जवळची व्यक्ती कोण आहे माहितीये? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द मिथिलानेच याविषयीचा एक उलगडा केला आहे. सोशल मीडियावर स्पोकन फेस्ट मुंबईतील तिच्या सादरीकरणातून ही सुरेख माहिती एखाद्या जादूच्या पेटाऱ्याप्रमाणे सर्वांसमोर आली. ज्यातून हळुवारपणे मिथिलाने काही आठवणी अलगद उलगडल्या.  


दादरमधील पारंपरिक अशा मध्यमवर्गीय कुटुंबात आजी- आजोबांसोबत बऱ्याच वर्षांचा काळ घालवणाऱ्या मिथिलाने त्यांच्यासोबतचं नातं सर्वांपुढे ठेवलं. आपल्या कलाविश्वात काम करण्याच्या निर्णयाला विरोद करण्यापासून ते अगदी आपली प्रशंसा करत आता तू फेमस होणार असं म्हणणाऱ्या आजोबांसोबतचं खास नातंही तिने यावेळी शब्दांवाटे मांडलं. 




'चांगल्या घरातल्या मुली नं.....शिक्षण संपवतात, नोकरी करतात....' असं म्हणत आपल्या आजीने कशा प्रकारे ही परिभाषा आपल्याला ऐकवली होती, याबाबत सांगताना मिथिलाच्या चेहऱ्यावर तिच्या आजी- आजोबांसाठीचं प्रेम व्यक्त झालं. आजोबांसोबतचं आंबट-गोड नातं मिथिलासाठी सर्वकाही. किंबहुना तिच्या कारकिर्दीत त्यांचीही एक खास भूमिकाच, असं म्हणायला हरकत नाही. 


पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत


Thank You, Bhau असं आपल्या आजोबांना म्हणत मिथिलाने भावनिक अंदाजात आपल्या आजोबांचे आभार मानले आहेत. वृत्तपत्रात आलेल्या प्रत्येक लेखाविषयी, मासिकाच्या मुखपृष्टाविषयी पाहुण्यांना मिथिलाबद्दल कौतुकाने सांगणाऱ्या आजोबांचे तिने आभार मानले. घरी उशिरा पोहोचल्यानंतरही कायम दार उघडण्याची वाट पाहणाऱ्या आजोबांचे मिथिलाने आभार मानले.