Anjali Arora : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका अश्लील व्हिडिओ क्लिपमुळे (MMS) लॉकअप फेम अंजली अरोरा (Anjali Arora) पुन्हा चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अंजली अरोरा असल्याचा दावा करण्यात येत होता. लोकांनी ट्रोल केल्यानंतर आता अंजलीने या प्रकरणावर मौन सोडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ खरा आहे की खोटा, अशा अनेक प्रश्नांवर अंजलीने स्वत: प्रतिक्रिया दिली आणि दावा केला की काही लोक तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिद्धार्थ कन्ननने (Siddharth Kannan) घेतलेल्या मुलाखतीदरम्यान अंजलीने याबाबत भाष्य केले आहे. या प्रकरणावर बोलताना अंजली अरोराला अश्रु अनावर झाले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये तिचे नाव आल्यानंतर तिच्या पालकांची काय प्रतिक्रिया होती हेही अंजलीने सांगितले आहे.


अंजली अरोराने 'कच्चा बदाम' या व्हिडिओवर डान्स करून घरोघरी आपली छाप पाडली आहे. आता त्याचा 'सैया दिल में आना रे' हा डान्स व्हिडिओ रिलीज झाला आहे. दरम्यान, एका व्हायरल एमएमएसशी तिचे नाव जोडले गेल्याने तिला खूप ट्रोल केले जात आहे. 


काय म्हणाली अंजली?


"लोक काय करत आहेत हे मला माहीत नाही. माझे नाव टाकून, माझा फोटो टाकून अंजली हा अरोराचा एमएमएस आहे सांगत आहेत. मला माहिती नाही लोक असं का करत आहेत. या सगळ्यांनी मला घडवले आहे ना? त्याचेही कुटुंब आहे, माझेही कुटुंब आहे. माझे कुटुंब, भाऊ सर्वजण व्हिडिओ पाहतात," असं म्हणत अंजली रडायला लागली.


"कधी कधी हे पाहते तेव्हा मला वाटते की लोक हे सर्व का करत असतील. त्या व्हिडीओमध्ये मी नसूनही युट्यूबचे व्ह्यूज वाढवण्यासाठी हे सुरु आहे का? माझेही कुटुंब आहे, भाऊ बहिण आहेत. माझा छोटा भाऊ हे सर्व पाहात असतो. कोणाची बदनामी करायची असेल तर ती अशी? म्हणतात ना कोणाची बरोबरी करता आली नाही तर त्याची बदनामी करा. हेच सर्व करत आहेत आणि यावर मी काय बोलू," असे अंजलीने म्हटले आहे.


आई वडिलांची काय होती प्रतिक्रिया?


मी जेव्हा लॉकअपमध्ये होते तेव्हापासूनच हे सुरु होते. चौथ्या आठवड्याच्या आसपास माझ्या आई वडिलांनी माझा फोटो लावून व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यानंतर माझ्या पालकांनी याबाबत मला एक शब्दही विचारला नाही. पण काही दिवसांपूर्वी या सर्व गोष्टी पुन्हा होऊ लागल्या, असे अंजली म्हणाली.



"मी काय चूक केली आहे. मी ती नाही. तुम्ही लोक मला खूप प्रेम देत आहात आणि खूप पाठिंबा देत आहात. मग तुम्ही अशा गोष्टी का करत आहात. कुणाचेही कुटुंब हे सहन करू शकेल की नाही याचाही विचारही करवत नाही. मी फक्त 21 वर्षांची आहे आणि ही गोष्ट हाताळण्यास तयार नाही. लोकांना अशा गोष्टी पसरवण्यात मजा येते. कुणाच्या इज्जतीशी खेळायला त्यांना लाज वाटत नाही," असेही अंजलीने म्हटले.