मुंबई : लोकसभा निवडणूकांची सुरूवात ११ एप्रिल पासून होणार आहे. मतदान तारखेच्या दरम्यान रमझान ईद आहे. रमझान असल्यामुळे निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असता गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी लोकसभा निवडणूकांवर होत असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली. जावेद अख्तर यांनी निवडणूक आयोगाला या विषयावर आधिक चर्चा न करण्याचा आग्रह केला. लोकसभा निवडणूकींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेता आजम खान आणि तृणमूल काँग्रेससहित काही पक्षांनी याला विरोध केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जावेद अख्तर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. आणि कॅप्शमध्य रमजान आणि निवडणूकांमध्ये होणाऱ्या चर्चा पूर्णपणे घृणास्पद असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. 



निवडणूक आयोगाने सोमवारी दिलेल्या प्रतिक्रियामध्ये रमझानचा पूर्ण महिना आम्ही निवडूक थांबवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. मतदान रमझान महिन्याच्या महत्वाच्या दिवशी अणि शूक्रवारी होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्याचप्रमाणे एमआयएम पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रमझान वरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी मुस्लिम समुदाय आणि रमझानचा वापर करु नका असे आवाहन ओवेसी यांनी केले आहे.