मुंबई : बॉलिवूडमधील रोमँटिक जोडीमधील एक म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. नुकताच जेनेलियाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे, जो तुम्हालाही वारंवार पाहिल्याशिवाय राहावणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान रितेश देशमुख अभिनेत्री प्रीती झिंटाची गळाभेट घेताना आणि तिच्या हातावर किस करताना दिसतोय. पण समोरच उभी असलेल्या जेनेलियाच्या चेहऱ्यावरील हावभाव तुम्ही पाहिलेत, तर तुम्हालाही वाटेल की आता रितेशचं काही खरं नाही. 


या व्हीडिओमध्ये जेनेलिया फेक स्माईल करतानाही दिसतेय. तसा हा व्हीडिओ जुना आहे आणि म्हणूनच अनेकांना उत्सुकता होती, की जेनेलिया घरी गेल्यावर रितेशला काय बरं बोलली असेल?


तर अखेर आज जेनेलियाने त्याचं मजेशीर उत्तर दिलं आहे. या जुन्या व्हीडिओसोबत नवा व्हीडिओ जोडून जेनेलिया रितेशला रट्टे देताना दिसतेय. या व्हीडिओमध्ये तेरा नाम लिया, तुझे याद किया असं गाणंही लावलंय, तर रितेशही बायकोसमोर हात जोडताना दिसतोय.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)


रितेश-जेनेलियाचा हा क्युट व्हीडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय, आणि चाहतेही त्याला पसंती दाखवताना दिसतायत. तसं रितेश आणि जेनेलिया कायमच एकमेकांवर किती प्रेम करतात, हे त्यांच्या सोशल मीडियावर त्यांनी टाकलेल्या पोस्टमधून दिसतंच असतं. त्यामुळेच जेनेलिया ऑफ कॅमेरा राहूनही लोकांच्या मनात आजही घर करून आहे. 


स्केटिंग करताना पडल्याने जेनेलियाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे नुकतंच रितेश जेनेलियाचे केस बांधतानाचाही एक क्युट व्हीडिओ जेनेलियाने शेअर केला होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)