मुंबई : माधुरी दीक्षितने एक दो तीन गाण्यावर डान्स केला आणि बॉलिवूडला एक डान्सिंग स्टार मिळाली. यामुळेच माधुरीच्या सिनेमाममध्ये एक आयटम डान्स तरी असतोच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वेळ अशी ही होती जेव्हा माधुरीचा डान्स पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर गर्दी व्हायची. बॉलिवूडमध्ये डान्सची देवी म्हटली जाणाऱ्या माधुरीला डान्सचा खूपच शौक होता. ती कथकची ट्रेंड डान्सर होती.


>


माधुरी चांगला डान्स तर करायची पण डान्समध्ये खऱ्या अर्थाने रंग भरायचे ते तिचे चेहऱ्यावरचे हावभाव. माधुरीच्या डान्सचा हृतिक देखील चाहता आहे. हृतिक देखील डान्सर किंग म्हटला जातो पण माधुरीच्या डान्सची जादू त्याच्यावर इतकी चालली की तो आजही तिचा खूप मोठा फॅन आहे.