Mrunal Thakur Scene Leaked Lust Stories: बहुचर्चित ओटीटीवरील 'लस्ट स्टोरी 2' हा चित्रपट 29 जून रोजी नेटफलिक्सवर (Netflix) रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही वेळातच 'लस्ट स्टोरीज 2' मधील अंगद बेदीसोबत मृणाल ठाकूरचा लव्ह मेकिंग सीन इंटरनेटवर (Hot Scene) लीक झाल्याचं पहायला मिळतंय. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. बोल्ड व्हिडिओचा बडिमार असलेल्या या चित्रपटात मृणाल (Mrunal Thakur) ठाकूरचा बोल्ड अवतार पाहून नेटकऱ्यांना घाम फुटलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सकाळापासून याच चित्रपटाची चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. मृणाल ठाकूर (Mrunal Thakur Bold Scene) आणि अंगद बेदीची ही लव्ह मेकिंग ऑनलाइन लीक झाल्यानंतर इंटरनेटवर खळबळ माजली आहे. मागील लस्ट स्टोरी चित्रपट हा कियारा अडवाणीमुळे (Kiara Advani Lust Stories) चर्चेत राहिला होता आता मृणाल ठाकूरच्या हॉट सीनमुळे चित्रपट बराच चर्चेत असल्याचं दिसतंय. 


आणखी वाचा - Bold Web Series: जरा हळूच... 'या' वेब सिरीज पाहून अंगाची होईल लाहीलाही!


करण जोहर दिग्दर्शित लस्ट स्टोरीज मधील तिच्या कामोत्तेजनाच्या दृश्याने अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतलंय. सध्या जो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे तो घोस्ट स्टोरीजचा आहे, ज्यामध्ये मृणाल ठाकूरची भूमिका होती, असा दावा देखील केला जात आहे. तमन्ना भाटियाचे चित्रपटातील हॉट आणि किसिंग सीन (kissing scene) व्हायरल होत आहेत.


पाहा Video



दरम्यान, लस्ट स्टोरिजमध्ये महिलांच्या त्या गोष्टीसाठी त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या मानापमानाला सामोरं जावं लागतं हे प्रभावी मांडण्यात आले आहे. त्यातील  बऱ्याचशा गोष्टी या सेक्सच्या माध्यमातून समोर येतात. लैंगिक आयुष्यावर आणि लैंगिक स्वातंत्र्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केल्याचं दिसून येतंय. काजोल , मृणाल ठाकुर , तमन्ना भाटिया , नीना गुप्ता , अमृता सुभाष , कुमुद मिश्रा , अंगद बेदी , विजय वर्मा आणि तिलोत्तमा या कलाकारांची झलक यामध्ये दिसून येत आहे.